endurance training
endurance training sakal
एज्युकेशन जॉब्स

खेलेगा इंडिया... : तरुण खेळाडूंचे एन्ड्युरन्स ट्रेनिंग

सकाळ वृत्तसेवा

मैदानावर एन्ड्युरन्सचे प्रशिक्षण आणि तरुण खेळाडू याबद्दल अनेक गैरसमज आहेत.

- महेंद्र गोखले

मैदानावर एन्ड्युरन्सचे प्रशिक्षण आणि तरुण खेळाडू याबद्दल अनेक गैरसमज आहेत. अनेक प्रशिक्षकांचे मुलांना दमवणे हेच सर्वसाधारणपणे प्रशिक्षणाचे उद्दिष्ट असते; आणि ते बऱ्याच अंशी यशस्वी करतात. परंतु प्रामाणिकपणे सांगायचे तर खेळाडूंना खेळ खेळताना एन्ड्युरन्सची क्षमता वाढवणे आवश्यक असते. एन्ड्युरन्सची व्याख्या करायची झाली तर ती म्हणजे एखाद्याची थकवा सहन करण्याची क्षमता किंवा बाहेरच्या तणावाचा स्वतःवरच परिणाम होऊ न देण्याची क्षमता! तसेच या तणावाच्या परिस्थितीत शरीराच्या हालचालींवर योग्य नियंत्रण ठेवण्याची क्षमता! तरुणांसोबत काम करताना, यशस्वी प्रशिक्षण कार्यक्रम तयार करण्याचा मुख्य घटक म्हणजे या प्रशिक्षणाची गुणवत्ता! किती यापेक्षा किती दर्जेदार हे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. कित्येक कोच, प्रशिक्षक आणि पालक जास्त कठीण प्रशिक्षण कार्यक्रम निवडताना दिसतात ज्यामध्ये खूप जास्त कठीण आणि जास्त तीव्रतेच्या प्रशिक्षणाचा समावेश होतो; परंतु व्यायाम किती योग्य प्रकारे केला जात आहे याबद्दल जराही काळजी घेतली जात नाही. प्रशिक्षणाच्या सदोष अंमलबजावणीमुळे चुकीचे व्यायाम प्रकार केले जातात आणि ते बदलणे खूप कठीण असते आणि त्यामुळे दुखापत होऊ शकते. एन्ड्युरन्स प्रशिक्षणाच्या संदर्भात, योग्य तंत्राकडे दुर्लक्ष केले जाते आणि जास्त प्रमाणाच्या किंवा तीव्रतेच्या व्यायामावर भर दिला जातो; पण हे खेळाडूंच्या हिताचे नाही.

एन्ड्युरन्स संदर्भात विचारात घेण्यासारखे घटक -

1) तंत्र/समन्वय/हालचाल

तरुण ॲथलिट्सला टिकून राहण्याच्या प्रशिक्षणात हालचालींमधली कार्यक्षमता हा एक महत्त्वाचा घटक आहे. तरुण खेळाडूंची क्षमता खऱ्या अर्थाने वाढवण्यासाठी कोच आणि प्रशिक्षकांनी संयम बाळगला पाहिजे. उत्तम तंत्र शिकवून, प्रशिक्षणाच्या प्रमाणामध्ये जराही वाढ न करता खेळाडूंना टिकून राहणे प्रभावीपणे शिकवू शकता. यालाच प्रशिक्षणाची गुणवत्ता म्हणतात.

2) शरीराचा प्रकार

तरुण खेळाडू जितके जास्त वजनदार असतील तितकी त्यांची सहनशक्ती कमी असेल. शरीराचे अतिरिक्त वजन असेल तर ऊर्जेच्या जास्त वापरामुळे एन्ड्युरन्सची क्षमता कमी होते.

3) मानसिकता

तरुण खेळाडू असल्याने त्यांची मानसिक कणखरपणा कमी असते. यावर मात करण्यासाठी अनेक कोच किंवा प्रशिक्षक मानसिक सामर्थ्य निर्माण करण्यासाठी मुद्दाम अवघड ड्रील आणि व्यायाम करून घेतात. शिस्तबद्ध परंतु साध्य करण्याजोगे व्यायामाचे आव्हान खेळाडूंसमोर ठेवले तर त्यांची टिकून राहण्याची क्षमता सुधारते आणि आपण नवीन आव्हानांचा यशस्वीपणे सामना करू शकतो हा आत्मविश्वासदेखील त्यांच्यामध्ये निर्माण होतो.

३ ते ७ वयोगटातील, मुलांच्या विशिष्ट व्यायाम प्रकारांमुळे त्यांची सर्वसामान्य एन्ड्युरन्स वाढते, परंतु आजच्या जगात समस्या ही आहे की मुले आवश्यक तेवढे ‘खेळत’ नाहीत. पुरुषांमध्ये सर्वसाधारणपणे १० ते १२ वयोगटातील आणि नंतर पुन्हा १६-१८ वयोगटातील मुलांमध्ये एन्ड्युरन्स राहण्याची क्षमता वाढलेली दिसून येते. महिलांमध्ये ८ ते १० वयोगटातील वाढ सर्वोत्तम दर्शविली जाते. वयाच्या १४ वर्षांनंतर, तरुण मुलींची एन्ड्युरन्स लेव्हल स्थिर होते आणि काहीवेळा कमी होते.

तरुण ॲथलिट्ससाठी एन्ड्युरन्स आधारित प्रशिक्षण कार्यक्रम तयार करताना लक्षात ठेवण्यासारखे अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. नेहमी ब्रॉड एरोबिक बेसपासून सुरुवात करणे. त्याची सुरुवात कमी ते मध्यम व्हॉल्यूमसह करा. दीर्घकाळापर्यंत आणि जास्त तीव्रतेने व्यायाम केला पाहिजे. संपूर्ण ॲथलेटिक विकास शास्त्राप्रमाणे, आपण तरुण खेळाडूंसोबत करत असलेल्या टिकून राहण्याच्या प्रशिक्षणाच्या उत्तेजनामध्ये बदल करणे गरजेचे आहे.

कोच, पालक आणि प्रशिक्षकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, प्रशिक्षणाच्या तीव्रतेपूर्वी आवाक्याची माहिती दिली जावी. तरुण क्रीडापटूंना प्रशिक्षण देताना प्रशिक्षणाचा सरफेस महत्त्वाचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

EVM Hacked: EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये; सापळा रचून दानवेंनी रंगेहाथ पकडलं

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates: भाजपविरोधातील पोस्ट तातडीनं हटवा; निवडणूक आयोगाचे 'X' ला आदेश

SCROLL FOR NEXT