Microsoft AI Course eSakal
एज्युकेशन जॉब्स

Microsoft AI Course : जनरेटिव्ह एआय शिकायचंय? मायक्रोसॉफ्टने लाँच केला मोफत कोर्स

हा एक प्रोफेशनल कोर्स असणार आहे, तसंच याचं सर्टिफिकेटही मिळणार आहे.

Sudesh

सध्या सगळीकडे एआयचा बोलबाला सुरू आहे. आर्टिफिशिअल इंटिलिजेन्स हेच भविष्य आहे असं अगदी पंतप्रधान मोदींनीही म्हटलं आहे. त्यामुळे वेळीच एआयबाबत कोर्स करून, त्यात करिअर करण्याचा विचार कित्येक तरुण करत आहेत. (Microsoft AI course)

तुम्हीदेखील असाच विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. मायक्रोसॉफ्ट या मोठ्या टेक कंपनीने एक मोफत जनरेटिव्ह एआय कोर्स लाँच केला आहे. लिंक्ड इन या कंपनीसोबत करार करून हा कोर्स लाँच करण्यात आला आहे. हा एक प्रोफेशनल कोर्स असणार आहे, तसंच याचं सर्टिफिकेटही मिळणार आहे. (Free AI Course)

मायक्रोसॉफ्टच्या कॉर्पोरेट व्हाईस प्रेसिडेंट केट बेहंकेन यांनी लिंक्ड इनवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. जनरेटिव्ह एआयबाबत हा पहिलाच ऑनलाईन लर्निंग कोर्स असणार आहे. २०२५ सालापर्यंत या कोर्ससाठी कसलीही फी घेण्यात येणार नाही.

कोर्सचा फायदा काय?

या कोर्समध्ये यूजर्सना एआयसंबंधी महत्त्वाच्या गोष्टी समजावण्यात येतील. तसेच, कोर्स संपल्यानंतर याचं एक सर्टिफिकेटही यूजर्सना मिळणार आहे. याचा फायदा यूजर्सना करिअरमध्ये मिळणार आहे. हा कोर्स सध्या इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : ठाकरे बंधू शिवाजी पार्कवर दाखल, बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन

Bigg Boss Marathi 6 Live Update: महाराष्ट्राचा भाऊ आला रे आला! रितेश देशमुखची ग्रँड एंट्री

Crime: पालकांनी पोटच्या अल्पवयीन मुलीला क्रूरपणे संपवलं; नंतर रात्री अंत्यसंस्कार, धक्कादायक कारण समोर

IND vs NZ: किंग कोहलीची घौडदौड कायम; रचला आणखी एक विश्वविक्रम; सचिन तेंडुलकर, संगकाराला टाकलं मागे

Employees DA: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्राच्या बरोबरीने महागाई भत्ता मिळणार; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय

SCROLL FOR NEXT