typing machine
typing machine sakal
एज्युकेशन जॉब्स

MPSC : टायपिंग प्रमाणपत्र पूर्व परीक्षेस करा सक्तीचे

सकाळ वृत्तसेवा

‘एमपीएससी’कडून राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहायक आणि उद्योग निरीक्षक या पाच संवर्गासाठी संयुक्त महाराष्ट्र गट ‘क’ सेवा परीक्षा घेण्यात येते.

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गट ‘क’ सेवा परीक्षा घेण्यात येते. यातील कर सहायक, लिपिक टंकलेखक या पदांसाठी टंकलेखन (टायपिंग) प्रमाणपत्राची अट ही पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करतानाच सक्तीची करण्यात यावी, अशी मागणी या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी केली आहे.

‘एमपीएससी’कडून राज्य उत्पादन शुल्क, कर सहायक, लिपिक टंकलेखक, तांत्रिक सहायक आणि उद्योग निरीक्षक या पाच संवर्गासाठी संयुक्त महाराष्ट्र गट ‘क’ सेवा परीक्षा घेण्यात येते. यापैकी कर सहायक आणि लिपिक टंकलेखक या पदांसाठी कोणत्याही क्षेत्रातील पदवी आणि टायपिंग प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना या प्रमाणपत्राची माहिती देणे बंधनकारक नाही. त्यामुळे टायपिंग प्रमाणपत्र नसणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पूर्व परीक्षा देण्याची संधी दिली जाते. परंतु, मुख्य परीक्षेच्या वेळी त्यांना टायपिंग प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. यामुळे या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. मात्र, पूर्व परीक्षेला पात्र ठरूनही प्रमाणपत्राअभावी असे विद्यार्थी मुख्य परीक्षेला अर्ज करू शकत नाही. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांचे नुकसान असल्याचे बालाजी चांडोळकर आणि मनिषा पाटील या विद्यार्थ्यांनी सांगितले.

विद्यार्थी म्हणतात...

२०२१ च्या जाहिरातीनुसार झालेल्या पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यापूर्वी टायपिंग प्रमाणपत्राची माहिती विद्यार्थ्यांना सादर करण्यास सांगावी. त्यानंतरच निकाला जाहीर करावा.

२०१८ व २०१९ या वर्षांतील पूर्व परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांची बेरीज केली, तर मेरिट वाढल्याने प्रमाणपत्र असून ही ९९५० विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षा देता आली नाही.

‘एमपीएससी’ने या पदांसाठी टायपिंग प्रमाणपत्राची अट ही मुख्य परीक्षेस घातली आहे. मात्र, यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. इतर प्रमाणपत्रे जशी आवश्यक असतात, त्याच प्रमाणे या प्रमाणपत्राची अट ही पूर्व परीक्षेस घालावी.

- महेश बडे, विद्यार्थी प्रतिनिधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इचलकरंजीत पवारांना पाहण्यासाठी गर्दी उसळल्याने चेंगराचेंगरी झाली आहे

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: दमदार सुरुवातीनंतर चेन्नई संघ सापडला अडचणीत; दुबेनंतर जडेजाही स्वस्तात बाद

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

SCROLL FOR NEXT