national education policy will give due respect to every indian language pm modi esakal
एज्युकेशन जॉब्स

PM Modi : देशातील प्रत्येक भाषेला योग्य सन्मान आणि श्रेय देण्याचे काम राष्ट्रीय शिक्षण धोरण करेल - पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारतीय शिक्षण संमेलनात नरेंद्र मोदी यांचे आश्‍वासन

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशातील प्रत्येक भाषेला योग्य सन्मान आणि श्रेय देण्याचे काम देशाचे नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण करेल आणि स्वार्थासाठी जी मंडळी भाषेचे राजकारण करण्याचा प्रयत्न करतील, त्यांना चाप बसविण्याचेही काम करेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाला तीन वर्ष पूर्ण झाले असून देशातील बुद्धिजीवी, शिक्षण तज्ञ आणि प्राध्यापकांनी एक अभियान म्हणून धोरणाकडे पाहिले आणि पुढे नेले, असेही ते म्हणाले. दिल्लीतील प्रगती मैदानावरील भारत मंडपम येथे आज अखिल भारतीय शिक्षण संमेलनाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले.

यावेळी मोदी यांनी पीएम-श्री योजनेनुसार शाळांना निधीचा पहिला हप्ता दिला. ते म्हणाले, की शिक्षण क्षेत्रात देशाचा विकास आणि देशाचे नशिब बदलण्याची शक्ती सामावलेली आहेे. आज २१ व्या शतकातील भारत अनेक ध्येय समोर ठेऊन वाटचाल करत असताना त्यात शिक्षण व्यवस्थेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. आपण सर्व जण या व्यवस्थेचे प्रतिनिधी आहात. ज्ञानासाठी चर्चा गरजेची असून शिक्षणासाठी निकोप संवाद आवश्‍यक आहे.

विचार आणि संवादाची परंपरा अखिल भारतीय शिक्षण संमेलनाच्या माध्यमातून पुढे नेण्यात येत आहे. यापूर्वी या परिषदेचे आयोजन वाराणसीत रुद्राक्ष सभागृहात झाले होते, याची आठवण त्यांनी करुन दिली. आपली शिक्षण व्यवस्था भारताची प्राचीन परंपरेची पाईक असून आधुनिक विज्ञान आणि उच्च तंत्रज्ञानाच्या युगात देखील तितकेच वेगाने वाटचाल करत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाची घोषणा केली तेव्हा कार्यक्षेत्र व्यापक होते. नवीन शिक्षण धोरण लागू करण्यासाठी सर्वांनी त्यागभावनेतून प्रयत्न केले, ही बाब कौतुकास्पद आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Three Language Policy : सीबीएसईच्या सहावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! त्रि-भाषा धोरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; काय दिले निर्देश?

Mumbai Indians ने कर्णधारासह ११ खेळाडूंना केलं रिटेन! फ्रँचायझीने संघाबाहेर केलेल्यांची यादीच जाहीर केली

DCM Sunetra Pawar : बारामती बँकेने कार्यक्षेत्र विस्तारुन आर्थिक सहाय्य करावे

El Nino Impact: अल निनोच्या कमी पावसाने रत्नागिरी, राजापूर, संगमेश्वरातील भातशेती कोलमडली; ३०-४० टक्के उत्पादन घटण्याचा अंदाज

DCM Sunetra Pawar : हारतुरे नको...मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करा

SCROLL FOR NEXT