भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण sakal
एज्युकेशन जॉब्स

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करतेय उपव्यवस्थापक पदांची भरती!

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करतेय उपव्यवस्थापक पदांची भरती! असा करा अर्ज

श्रीनिवास दुध्याल

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये (NHAI) सरकारी नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे.

सोलापूर : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमध्ये (National Highways Authority of India - NHAI) सरकारी नोकरी (Government job) शोधत असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी आहे. भारत सरकारच्या (Government of India) रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने उपव्यवस्थापक (वित्त आणि लेखा) आणि उपव्यवस्थापक (तांत्रिक) या पदांच्या भरतीसाठी दोन स्वतंत्र जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत.

प्राधिकरणाने प्रसिद्ध केलेल्या भरती जाहिरातींनुसार एकूण 90 पदांसाठी भरती करायची आहे. इच्छुक उमेदवार NHAI च्या अधिकृत वेबसाइट nhai.gov.in वर उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन फॉर्मद्वारे अर्ज करू शकतात. उपव्यवस्थापक (वित्त आणि लेखा) पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर आहे तर उपव्यवस्थापक (तांत्रिक) पदांसाठी उमेदवार 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करू शकतील.

उपव्यवस्थापक (वित्त आणि लेखा) भरती

NHAI ने जारी केलेल्या भरती जाहिराती (NTA/NHAI/2021/1) नुसार, जाहिरात केलेल्या उपव्यवस्थापक (वित्त आणि लेखा) पदांपैकी 6 अनारक्षित आहेत, तर 5 OBC (नॉन-क्रिमीलेयर), 3 SC, 1 ST आणि 2 EWS उमेदवारांसाठी राखीव आहेत. या पदांसाठी केवळ तेच उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत, ज्यांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून वाणिज्य किंवा सीए किंवा सीएमएमध्ये पदवी उत्तीर्ण केलेली आहे किंवा वित्त विषयात एमबीए पदवी घेतली आहे. याशिवाय उमेदवारांना संबंधित कामाचा चार वर्षांचा अनुभव असावा. तसेच, अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार उमेदवारांचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

उपव्यवस्थापक (तांत्रिक) ची भरती

दुसऱ्या भरतीच्या जाहिरातीनुसार NHAI द्वारे प्रसिद्ध केलेल्या उपव्यवस्थापक (तांत्रिक) भरती जाहिरात केलेल्या 73 पदांपैकी 27 अनारक्षित आणि 21 OBC-NCL, 13 SC, 5 ST आणि 7 EWS उमेदवारांसाठी राखीव आहेत. फक्त तेच उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात, जे संघ लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे आयोजित भारतीय अभियांत्रिकी सेवा (IES), 2020 च्या मुलाखतीच्या (व्यक्तिमत्त्व चाचणी) टप्प्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT