Nava Vijaypath by Avinash Dharmadhikari competitive exam ias ips
Nava Vijaypath by Avinash Dharmadhikari competitive exam ias ips Sakal
एज्युकेशन जॉब्स

स्पर्धा परीक्षा- अथपासून इतिपर्यंत...

सकाळ वृत्तसेवा

भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) किंवा भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) दाखल होऊन उच्चपदस्थ अधिकारी व्हावं असं स्वप्न बऱ्याच जणांंचं असतं. हे स्वप्न बाळगणारे बहुतेक जण दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्या की, स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू करतात.

स्पर्धा परीक्षांची तयारी नेमकी कशी करावी आणि या सेवांमध्ये दाखल होण्यासाठी आवश्यक असणारं व्यक्तिमत्त्व कसं विकसित करावं, याचं उत्कृष्ट मार्गदर्शन करणारं पुस्तक म्हणजे अविनाश धर्माधिकारी लिखित ‘नवा विजयपथ’.

माजी प्रशासकीय अधिकारी असलेल्या अविनाश धर्माधिकारी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची अथपासून इतिपर्यंत सर्व माहिती अगदी नेमकेपणाने दिली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी हा विषय क्लिष्ट असल्याचं लक्षात घेऊन धर्माधिकारी यांनी या पुस्तकाची भाषा अत्यंत साधी आणि शैली संवादी ठेवली आहे.

त्यामुळेच पुस्तक वाचत असताना परीक्षांच्या तयारीबाबतच्या अनेक संकल्पना सहजपणे समजतात. अनेक ठिकाणी विविध संकल्पना समजावण्यासाठी चपखल उदाहरणेही आली आहेत. त्यामुळे पुस्तक वाचताना कंटाळा येत नाही.

अगदी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यापासून ते स्पर्धा परीक्षांची ओळख, या परीक्षांचं विस्तारित रूप, विविध टप्पे, ते टप्पे यशस्वीपणे पार करण्यासाठी योग्य दिशेने कसे प्रयत्न करावेत? या सर्वांबाबत पुस्तकात सखोल मार्गदर्शन करण्यात आलं आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे लेखक स्वतः या परीक्षांना सामोरे जाऊन यशस्वी झाल्याने त्यांंचं मार्गदर्शन स्वानुभवावर आधारलेलं आहे.

या पुस्तकातील ‘इंग्लिशचं भूत’ हे प्रकरण इंग्रजी भाषेची भीती वाटणाऱ्या सर्वांसाठी उपयुक्त ठरणारं आहे. इंग्रजी भाषा कशी सुधारावी यासाठी या प्रकरणात केलेलं मार्गदर्शन सर्वांनी आवर्जून वाचायला हवं. त्याचप्रमाणे अभ्यासाचे कौशल्य हे प्रकरणदेखील परीक्षा देणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याला उपयुक्त ठरेल असंच आहे.

मुलाखतीची तयारी कशा पद्धतीने करावी, आपली देहबोली कशी असावी हे मार्गदर्शनही आहे. पण हे पुस्तक इथेच थांबत नाही तर, प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतरही आपला कामाबद्दलचा दृष्टिकोन कसा असायला हवा? याचं मार्गदर्शनही लेखकाने त्याच्या समृद्ध अनुभवांच्या आधारे केलं आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी हे पुस्तक वाटाड्याचं काम करेल, यात कोणतीच शंका नाही.

(संकलन - रोहित वाळिंबे)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: शनिवार वाड्यात बेवारस बॅग आढळल्याने खळबळ, बॉम्ब शोधक पथक दाखल

Arvind Kejriwal: जेल की बेल! केजरीवालांचा तरुंगाबाहेर शेवटचा दिवस, आजची सुनावनी ठरवणार 'आप'चे भविष्य

Indian Typing Man : भारताचा टायपिंग मॅन! तिसऱ्यांदा गिनीज बुकमध्ये नोंद करत स्वतःचा रेकॉर्ड मोडला, पाहा व्हिडिओ

West Bengal EVM: मतदानकेंद्रावर धक्कादायक प्रकार! जमावाने EVM टाकले पाण्यात; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update: "आम्ही बिहारमधील सर्व 40 जागा जिंकू," राबडी देवींचा राडा

SCROLL FOR NEXT