NCC Maharashtra top in National Shooting Competition  sakal
एज्युकेशन जॉब्स

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राचा डंका

‘एनसीसी’च्या महाराष्ट्र संचालनालयाने पटकावले विजेतेपद

अक्षता पवार

पुणे : राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) अंतर संचालनालय राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्र संचालनालयाने विजेतेपद पटकावले आहे. चंडीगड येथे पार पडलेल्या या स्‍पर्धेत महाराष्ट्राच्या ‘एनसीसी’ कॅडेटने चमकदार कामगिरी करताना राज्याला सलग दुसऱ्यांदा विजेतेपदाचा मान मिळवून दिला आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्र संचालनालयाच्या कॅडेटची निवड आणि प्रशिक्षण पुणे ‘एनसीसी’चे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर.के. गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. अंतर बटालियन आणि अंतर गट स्पर्धांच्या मालिकेनंतर राज्यातील विविध ‘एनसीसी’ ग्रुपमधून १७ कॅडेटची निवड करण्यात आली होती. यामध्ये आठ मुले आणि नऊ मुलींचा समावेश होता. तर १७ पैकी ११ कॅडेट पुणे ‘एनसीसी’ ग्रुपचे होते.

स्पर्धेत देशातील एकूण १७ राज्यांच्या संचालनालयांनी भाग घेतलेली ही स्पर्धा ४ ते १५ जुलै दरम्यान पार पडली. ज्यात महाराष्ट्र संचालनालयाने ८२८६ गुणांसह प्रथम, तमिळनाडू संचालनालयाने द्वितीय आणि बिहार व झारखंड संचालनालयाने संयुक्तरित्या तृतीय क्रमांक पटकाविला. यावेळी झालेल्या १० मीटर एअर रायफल स्पर्धेतही महाराष्ट्र संघातील दोन कॅडेटने सुवर्ण पदक पटकावले. तर, या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या जी.व्ही मावळणकर राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी संघातील १६ कॅडेट पात्र ठरले आहेत.

महाराष्ट्र संचालनालयाने या राष्ट्रीय स्पर्धेत सहा सुवर्ण, पाच रौप्य आणि एक ब्राँझ पदक जिंकून पदकतालिकेत अव्वल क्रमांक पटकाविला. गेल्या वर्षीही महाराष्ट्र संचालनालयाने प्रथम क्रमांक पटकाविला होता, तर २०१८ आणि १९ मध्ये त्यांना द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. महाराष्ट्र संघातील कॅडेटच्या प्रशिक्षणाची जबाबदारी ३६ महाराष्ट्र बटालियन ‘एनसीसी’चे प्रशिक्षक कर्नल सतीश शिंदे यांनी पार पाडली. महाराष्ट्र संचालनालयातील अतिरिक्त महासंचालक, मेजर जनरल वाय.पी.खंडुरी यांनी अखिल भारतीय जी.व्ही. मावळणकर नेमबाजी स्पर्धेसाठी पात्र आणि पदके जिंकलेल्या सर्व कॅडेटचे यावेळी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT