NEET Exam Sakal
एज्युकेशन जॉब्स

NEET Exam : हुश्शऽऽ झाली एकदाची ‘नीट’ परीक्षा!

- वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी लाखो विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वर्षभर ‘नीट’ परीक्षेसाठी केलेली सातत्यपूर्ण तयारी...बारावीची परीक्षा संपल्यानंतरही वेगाने केलेली उजळणी...अन्‌ उन्हाळी सुट्यांच्या दिवसातही मज्जा न करता परीक्षेसाठी केलेली पूर्वतयारी अन्‌ ‘डॉक्टर’ होण्याचे स्वप्नं उराशी बाळगत लाखो विद्यार्थ्यांनी वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ‘नीट’ ही प्रवेश परीक्षा रविवारी दिली.

परीक्षेत भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे प्रश्न काहीसे कठीण आणि लांबट असल्याचे परीक्षार्थ्यांचे म्हणणे आहे. देशातील जवळपास लाखभर वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या जागांसाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीमार्फत (एनटीए) घेण्यात आलेल्या या परीक्षेसाठी सुमारे २४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.

देशातील ५५७ शहरांमध्ये, तर देशाबाहेरील १४ शहरांमध्ये ही परीक्षा रविवारी दुपारी दोन ते सायंकाळी पाच वाजून २० मिनिटांपर्यंत होती. परीक्षा दुपारी दोन वाजता सुरू होणार असली, तरी परीक्षार्थींना सकाळी साडे अकरा वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोचण्यास सांगण्यात आले होते.

त्यानंतर विद्यार्थ्यांची तपासणी होऊन त्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये सोडण्यात येत होते. त्यामुळे परीक्षा केंद्रांच्या बाहेरील परिसरात विद्यार्थी आणि पालकांनी सकाळी नऊ-दहा वाजल्यापासून येण्यास सुरवात केली होती.

पुण्यातूनही हजारो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. ‘‘जीवशास्त्राचे प्रश्न अन्य विषयांच्या तुलनेने सोपे होते. तर भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचे प्रश्न कठीण आणि लांबट होते,’’ असे काही विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.

तर, रसायनशास्त्राचे प्रश्न सर्वाधिक कठीण होते आणि भौतिकशास्त्राचे प्रश्नांची उत्तरे लिहिताना खूप वेळ लागला, असे काही परीक्षार्थींचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत ‘एनटीए’तर्फे परीक्षेची उत्तरसूची जाहीर करण्यात येईल, ही उत्तरसूची लवकरच अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल. विद्यार्थी परीक्षा केंद्रात परीक्षा पेपर सोडवित असताना पालक मात्र रणरणत्या उन्हात परीक्षा केंद्राबाहेर उभे होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : पुण्यात पीएमपीच्या ब्रेकडाऊनमध्ये वाढ, एका महिन्यात २४०० घटना

Health Insurance Updated Rules: आता फक्त २ तास ॲडमिट होऊनही क्लेम करता येणार हेल्थ इन्शुरन्स! जाणून घ्या योजना

Sindhudurg : सोनाली गावडे मृत्यू प्रकरण, ‘ती’ दुसरी छत्री कोणाची? बांदा पोलिसांसमोर गूढ उकलण्याचे आव्हान

Eknath Shinde Delhi Visit : पावसाळी अधिवेशन सुरु असताना एकनाथ शिंदेंचं दिल्ली वारी, अमित शहांसह वरिष्ठ नेत्यांची घेतली भेट, नेमकी काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT