electrical engineers  sakal
एज्युकेशन जॉब्स

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधील संधी

विजेशिवाय जीवन हे कल्पनेपलीकडचे आहे. विजेची निर्मिती अनेक प्रकारांनी होते. वीजनिर्मिती, वीजवहन, विजेचे प्राथमिक वितरण, शेवटच्या घटकापर्यंत वीजवाटप ही सर्व कामे ऊर्जेसंदर्भातील यंत्रणेची आहे.

सकाळ वृत्तसेवा

करिअर अपडेट

प्रा. विजय नवले,करिअरतज्ज्ञ

विजेशिवाय जीवन हे कल्पनेपलीकडचे आहे. विजेची निर्मिती अनेक प्रकारांनी होते. वीजनिर्मिती, वीजवहन, विजेचे प्राथमिक वितरण, शेवटच्या घटकापर्यंत वीजवाटप ही सर्व कामे ऊर्जेसंदर्भातील यंत्रणेची आहे. इथे प्रामुख्याने इलेक्ट्रिकल इंजिनीअरचा सहभाग महत्त्वाचा आहे. इलेक्ट्रिकल पॉवर स्टेशनच्या डिझाइनपासून इलेक्ट्रिकल वस्तूंच्या डिझाइनपर्यंत आणि संशोधनापासून मेंटेनन्सपर्यंतच्या अत्यंत महत्त्वपूर्ण कामात इलेक्ट्रिकल इंजिनीअर कायम ‘ऑन मोड’वर असतो. बीई/बीटेक इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठीची पारंपरिक पदवी आहे.

कालावधी व पात्रता

बीई/बीटेक इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग हा पदवी अभ्यासक्रम बारावी सायन्सनंतर चार वर्षांचा आहे. डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग नंतरदेखील थेट द्वितीय वर्षात प्रवेश करून तीन वर्षांमध्ये पदवी पूर्ण करता येते. बारावी सायन्समध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स हे विषय घेऊन बोर्डाच्या परीक्षेत या पीसीएम ग्रुपमध्ये ४५% (४०% मागासवर्गीय प्रवर्गांसाठी) गुण असावेत. पीसीएम मार्कांचा हा निकष पूर्ण होत नसेल, तर केमिस्ट्रीऐवजी अन्य (व्होकेशनल) विषयांचे मार्क्स विचारात घेता येतात. पीसीएम ग्रुपमध्ये एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षेमध्ये शून्यापेक्षा अधिक पर्सेन्टाइल असावे. मेरिटसाठी सीईटीच्या/ जेईई मेनच्या गुणांचा विचार केला जातो.

स्वरूप

चार वर्षांच्या अभ्यासक्रमात आठ सेमिस्टर असतात. दैनंदिन वेळापत्रकात थेअरी लेक्चरसोबतच प्रॅक्टिकल्स असतात. सातत्याने असाइन्मेंट्स कराव्या लागतात. प्रत्यक्ष इलेक्ट्रिकल संबंधित कामाचा अनुभव घेता येतो. इलेक्ट्रिकल डिझाइनच्या कामासंदर्भात प्रात्यक्षिके करावी लागतात. इंडस्ट्रियल व्हिजिट्सद्वारे इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी कामाचे साक्षात स्वरूप पाहण्याची संधी मिळते. विद्युतशक्तीनिर्मिती, वहन, वितरण, मेंटेनन्स याचे प्रत्यक्ष कामकाज पाहण्याचा अनुभव विद्यार्थ्यांना येतो. चार वर्षांच्या शेवटी प्रोजेक्ट वर्क असते. यामध्ये एखाद्या तांत्रिकी संकल्पनेवर प्रतिकृती किंवा उपयुक्त रचना मॉडेल स्वरूपात किंवा चलत स्वरूपात करता येते. इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली, तर इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग कंपनीमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळू शकतो.

अभ्यासले जाणारे विषय

इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिजिटल सीस्टिम्स, इलेक्ट्रिकल मशीन्स, इलेक्ट्रिकल सर्किट्स, इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स, इन्स्ट्रुमेंटेशन, मायक्रोप्रोसेसर्स, ॲनालॉग कम्युनिकेशन, कंट्रोल इंजीनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स, डिजिटल कम्युनिकेशन, ट्रान्समिशन लाइन्स, पॉवर सीस्टिम, इलेक्ट्रिकल ड्राइव्ह अँड कंट्रोल आदी विषय अभ्यासावे लागतात.

उच्च शिक्षण

पॉवर सिस्टीम, व्हीएलएसआय डिझाईन, सिग्नल प्रोसेसिंग, एम्बेडेड सीस्टिम आदी विविध स्पेशलायजेशनमध्ये गेटची परीक्षा देऊन एमई/एमटेकसारखे उच्च शिक्षण घेता येते. ते शक्य नसल्यास या संदर्भातील पोस्ट ग्रॅज्युएट/ॲडव्हान्सड डिप्लोमा कोर्सेसदेखील उपलब्ध असतात. परदेशात जाऊन एमएस करता येईल.

शासकीय क्षेत्र

भेल, पॉवर ग्रीड, एनटीपीसी, एनपी-सीआयएल, सीआयएल, सेल, गेल, एचसीएल, ओएनजीसी, इंडियन रेल्वे, डीआरडीओ, इस्रो आदी शासकीय आस्थापनांमध्ये ज्युनिअर इंजिनीअर, ग्रॅज्युएट अप्रेन्टिस, जीईटी, असिस्टंट मॅनेजर आदी पदांवर निवड होऊ शकते. केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांत नोकरीसाठीच्या संधी असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येसुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनीअर हे पद उपलब्ध असते. स्पर्धा-परीक्षांच्या माध्यमातून वरिष्ठ पदांवर नियुक्त्या होतात. यूपीएससीद्वारे आयएएस-आयपीएससह अन्य विविध नागरी सेवा, आयईएस (इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस), डिफेन्समधील सीडीएस, एमपीएससीद्वारे राज्य सेवा आणि तांत्रिकी सेवांसाठीच्या संधी मिळतात.

पुढील स्कोप

विजेची उपलब्धता हा विषय कायमच आपल्या सर्वांच्या गरजेचा असणार आहे. वीज असेल, तर हे आधुनिक जग चालू राहील. ऊर्जानिर्मितीमध्ये अजूनही अनेक संशोधनाच्या गोष्टी घडणे अपेक्षित आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात जिथे सौरशक्ती ज्यास्त प्रमाणात उपलब्ध आहे, तिथे सोलर एनर्जी हा विषय मोठे बदल घडवू शकेल आणि त्यातील पुढील काम नक्कीच आशादायी असेल.अन्य पर्यायांचा सुद्धा विचार आगामी काळात होईल. विजेच्या निर्मितीपासून सुरक्षिततेपर्यंत आणि प्रॉडक्ट्सपर्यंत होऊ शकणाऱ्या प्रवासात इलेक्ट्रिकल क्षेत्रात मन लावून काम करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

SCROLL FOR NEXT