केंद्र सरकारच्या 'या' विभागातील विविध पदांसाठी पुन्हा संधी ! Canva
एज्युकेशन जॉब्स

केंद्र सरकारच्या 'या' विभागातील विविध पदांसाठी पुन्हा संधी !

केंद्र सरकारच्या "या' विभागातील विविध पदांसाठी पुन्हा संधी !

श्रीनिवास दुध्याल

जर तुम्ही केंद्र सरकारच्या विभागांमध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुक असाल आणि थेट भरतीच्या संधींची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

सोलापूर : जर तुम्ही केंद्र सरकारच्या (Central Government) विभागांमध्ये सरकारी नोकरीसाठी (Government job) इच्छुक असाल आणि थेट भरतीच्या संधींची वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. भारत सरकारच्या (Government of India) एमएसएमई मंत्रालयाअंतर्गत (Ministry of MSME) कॉयर बोर्डाने (Coir Board) गेल्या महिन्यात 15 जुलै 2021 रोजी विविध पदांच्या एकूण 36 रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2021 निश्‍चित करण्यात आली होती, जी आता एक महिन्याने म्हणजेच 15 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार ज्यांना अद्याप कॉयर बोर्डात सरकारी नोकरीच्या या संधीचा लाभ घेता आला नाही, त्यांना आता अर्ज करण्याची आणखी एक संधी आहे.

या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत

कॉयर बोर्डाने ज्या पदांसाठी रिक्त जागा जाहीर केल्या आहेत त्यामध्ये वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (अभियांत्रिकी), वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (उत्पादन विविधता), वैज्ञानिक सहाय्यक (अभियांत्रिकी), शोरूम व्यवस्थापक ग्रेड 3, सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, कनिष्ठ आशुलिपिक, मेकॅनिक ग्रेड 2, हिंदी टंकलेखक, निम्न विभाग लिपिक, सेल्समन, प्रशिक्षण सहाय्यक आणि मशिन ऑपरेटर. या सर्व पदांवर नियमितपणे नियुक्ती होणार आहे.

जाणून घ्या पात्रता

कॉयर बोर्डाने जाहिरात केलेल्या पदांसाठी वेगळी पात्रता निर्धारित केली आहे जी दहावी पास ते पदवीधर आहे. ज्या पदांसाठी दहावी उत्तीर्णता विहित आहे ते प्रशिक्षण सहाय्यक, सेल्समन, लोअर डिव्हिजन लिपिक, कनिष्ठ आशुलिपिक आणि हिंदी टंकलेखक या पदांसाठी आहे. तथापि, यासह इतर पात्रता / कौशल्ये देखील आवश्‍यक आहेत, जी कॉयर बोर्ड अधिसूचनेत पाहू शकता.

कॉयर बोर्ड अधिसूचना 2021 ची ही आहे लिंक : http://coirboard.gov.in/wp-content/uploads/2021/07/Notification-dated-15-07-2021-Hindi.pdf

या लिंकद्वारे अर्ज करा : http://recruitment.coirboard.gov.in/frm_login.aspx

या लिंकवरून अर्जाच्या तारखेच्या विस्ताराशी संबंधित सूचना पाहा : http://coirboard.gov.in/wp-content/uploads/2021/08/Corrigendum_Rec.pdf

असा करा अर्ज...

अर्ज करण्यासाठी उमेदवार कॉयर बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट coirboard.gov.in वर दिलेला ऑनलाइन फॉर्म भरू शकतात. कॉयर बोर्डाने जाहिरात केलेल्या पदांसाठी वेगवेगळे अर्ज शुल्क निर्धारित केले आहे जे 300 ते 500 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT