Cambridge University sakal
एज्युकेशन जॉब्स

परदेशी शिकताना : केंब्रिज विद्यापीठातील संधी

पदवीनंतर परदेशी शिक्षण घेण्यासाठी चांगल्या विद्यापीठाच्या शोधात असाल तर केंब्रिज विद्यापीठ हा उत्तम पर्याय आहे.

सकाळ वृत्तसेवा

- ॲड. प्रवीण निकम

पदवीनंतर परदेशी शिक्षण घेण्यासाठी चांगल्या विद्यापीठाच्या शोधात असाल तर केंब्रिज विद्यापीठ हा उत्तम पर्याय आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाइतकेच प्रतिष्ठित असणारे सर्वांत प्राचीन असे इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठ. १२०९मध्ये स्थापन झालेल्या केंब्रिज विद्यापीठाला विशिष्ट असा ऐतिहासिक व शैक्षणिक वारसा लाभलेले आहे.

शैक्षणिक वातावरण व संशोधन कार्याचा विचार केला असता केंब्रिज विद्यापीठातील अभ्यासक्रम हा विशेष आहे. या विद्यापीठाचे आपल्या भारतासोबत असणारे संबंध हे अनोखे आहे. सर दोराबजी टाटा, जवाहरलाल नेहरू, मनमोहनसिंग, राजीव गांधी, झिया मोदी, जयंत नारळीकर असे असंख्य भारतीय दिग्गज मंडळींनी या विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

तंत्रज्ञान, बहुभाषिकता, सर्वसमावेशक शिक्षण, शेती यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये भारतीय भागीदारांसोबत अनेक प्रमुख संशोधन प्रकल्पांमध्ये केंब्रिज विद्यापीठाचा भारतामध्ये शैक्षणिक सहभाग आहे. इतकेच नाहीतर आंतरराष्ट्रीय बोर्डाचा शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी केंब्रिज विद्यापीठाचे सहकार्य मिळण्यासंदर्भात सहमतीचा करार दर्शवला आहे.

सध्या केंब्रिज विद्यापीठात ३०पेक्षा जास्त पदवी अभ्यासक्रम आहेत. यात ६५ पेक्षा जास्त विषयांचा समावेश आहे. यामध्ये केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्स, अर्थशास्त्र, शिक्षण, कृषी, ‌गणित व विज्ञान, मॅनेजमेंट, डिझाईन यावर आधारित विविध कोर्स उपलब्ध आहेत. या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी इंग्रजी भाषेचे पुरेपूर ज्ञान असणे गरजेचे आहे. पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी केंब्रिज विद्यापीठात ३००हून अधिक पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा समावेश आहे. ज्यात तुम्हाला शैक्षणिक विषयांबरोबरच कौशल्य विकास व संशोधनाच्या संधींच्या विविध बाबी देखील शिकवल्या जातात‌.

तुम्ही तुमच्या विषयाला आणि संशोधनाच्या आवडींना अनुरूप असा अभ्यासक्रम निवडू शकता. तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्या विषयातील तज्ज्ञ मंडळी व मदत करणारे सेंटर कायम सोबत असते. संशोधन क्षेत्रातील केंब्रिज विद्यापीठाचे कार्य हे अफाट आहेच. याशिवाय येथील ग्रंथालय व संदर्भ ग्रंथसंपदा, संग्रहालये, कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण केंद्र, भाषेतील बारकावे समजून घेण्यासाठी व त्यावर काम करण्यासाठी विशेष केंद्र, सर्व पदव्युत्तर विद्यार्थांसाठी संशोधन कौशल्यांचे प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन व इतर सुविधा या सर्व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी व विकासासाठी महत्त्वाच्या आहेत.

(लेखक समता सेंटर या स्वयंसेवी संघटनेचे संस्थापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT