Engineering Career Sakal
एज्युकेशन जॉब्स

टेक करिअर : पायाभूत शाखांचा पर्याय

यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी आणि स्थापत्य अभियांत्रिकी या पायाभूत शाखांकडे विद्यार्थी वर्गाचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

प्रा. प्रज्ञा कोसबे (

यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी आणि स्थापत्य अभियांत्रिकी या पायाभूत शाखांकडे विद्यार्थी वर्गाचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

आजचे संगणक आणि माहिती युग आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचा ओढा याच शाखांकडे आहे. कोणालाही विचारले की तुम्ही कुठली शाखा निवडणार, तर उत्तर ठरलेले असते; ते म्हणजे संगणक किंवा त्याच्याशी निगडित कुठलीही शाखा चालेल. परंतु एवढ्या संख्येने विद्यार्थी एकाच शाखेत धाव घेत असतील, तर त्यात स्पर्धा किती वाढेल आणि संधी कितपत मिळतील, याचाही दूरदृष्टीने विचार करणे आवश्यक आहे.

यंत्र अभियांत्रिकी, विद्युत अभियांत्रिकी आणि स्थापत्य अभियांत्रिकी या पायाभूत शाखांकडे विद्यार्थी वर्गाचे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कळपासारखे एकाच दिशेने चालत न जाता डोळसपणे आपली आवड, क्षमता आणि भविष्यातील इतर शाखांमधील उपलब्ध संधी यांचा देखील विचार व्हावयास हवा.

यंत्र अभियांत्रिकी शाखेतील संधी

यंत्र अभियांत्रिकी (मॅकेनिकल इंजिनिअरिंग) ही शाखा प्रामुख्याने गतिशास्त्र (कायनामेटिक्स), संरचनात्मक विश्लेषण (स्ट्रक्चरल ॲनॅलिसिस), उष्मगतिकी, (थर्मोडायनामिक्स), द्रवयांत्रिकी (फ्लुईड मेकॅनिक्स), ऊर्जाक्षेत्र (पॉवर सेक्टर), रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग आणि वाहन उद्योग यांच्याशी निगडित क्षेत्रात संधी उपलब्ध करते. सद्य-स्थितीत तांत्रिक प्रगतीमुळे या क्षेत्रातील संधी या अगणित आहेत. भारतातच नव्हे; तर परदेशात देखील संधी आहेत.

सध्या कटिआ, प्रोई, हायपरमेश आणि एन्सिस यांसारखी अनेक सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. त्यामुळे डिझाईन आणि सिम्युलेशनमध्ये मेकॅनिकल अभियंत्यांशिवाय पर्याय नाही. कारण ही मुख्यत्वे मॅकेनिकलशी निगडित सॉफ्टवेअर आहेत. जे मॅकेनिकल अभियंते व्हर्चुअल सिमुलेशन (आभासी प्रतिकृतीमध्ये) पारंगत असतील, त्यांना भविष्यात विविध उद्योग क्षेत्रांमधून प्रचंड मागणी असणार आहे. कारण हे सॉफ्टवेअर उत्पादनाचे टप्पे (प्रॉडक्ट सायकल) कमी करणे, अर्थात किंमत आणि वेळ कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतील. आजकाल थ्रीडी प्रिंटिंग हा परवलीचा शब्द झाला आहे त्यामुळे या क्षेत्रात देखील अनेक संधी आहेत.

डिझाईन आणि उत्पादन क्षेत्र

इलेक्ट्रिक जनरेटर, इंजिन, टर्बाइन, रेफ्रिजरेटर, एअर कंडिशनर आणि इतर मशिन यांची डिझाईन आणि उत्पादन हे फक्त मॅकेनिकल अभियंता करू शकतात. त्याचप्रमाणे दैनंदिन ‘इंडस्ट्री मेंटेनन्स’साठीही मॅकेनिकल शिवाय पर्याय नाही. त्याचप्रमाणे हेल्थकेअर आणि वेगवेगळी उपकरणे आणि मशिन डिझाईन आणि उत्पादनक्षेत्रात देखील अनेक संधी दडलेल्या आहे.

वाहन उद्योग क्षेत्र

भारतात आता वाहनांसाठी BS६ चे निकष लागू झालेले आहेत. हे निकष पूर्ण करण्यासाठी वाहन उत्पादनक्षेत्र, कार्यशाळा (वर्कशॉप), असेंब्ली लाईन आणि इतर वाहन उद्योगाशी निगडित क्षेत्रात कुशल कामगारांची गरज लागणार आहे. त्यामुळे आता वाहन उद्योगातील संधी या १५ ते २० टक्क्यांनी वाढणार आहेत. सध्या पर्यावरण पूरक वाहनांची नितांत गरज आहे. त्यावर जगात भरपूर संशोधन सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात संकरित वाहने (हायब्रीड व्हेईकल) आणि विद्युत वाहन (इलेक्ट्रिक व्हेईकल्स) उद्योगात मेकॅनिकल अभियंत्यांची महत्त्वाची भूमिका असणार आहे.

इंडस्ट्री ४.० हे इंटरनेट ऑफ़ थिंग्ज, ऑटोमेशन, रोबोटिक्स यांचा मिलाफ आहे. इंडस्ट्री ४.० मुळे येणाऱ्या काळात स्वयंचलन आणि यंत्रमानवशास्त्रमध्ये (ऑटोमेशन अँड रोबोटिक्स) देखील भरपूर संधी आहेत. पारंपारिक ऊर्जास्रोत हे संपण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पर्यायी ऊर्जा क्षेत्रात देखील मॅकेनिकल अभियंत्यांची गरज आहे मॅकेनिकल इंजिनिअर असे इतर सॉफ्टवेअर शिकून संगणक क्षेत्राशी निगडित कंपनीत नोकरी मिळवू शकतात. मेकॅनिकल इंजिनिअर हा इतर शाखांच्या तुलनेत स्वयंरोजगार निर्माण करू शकतो. कोरोना विषाणूमुळे स्वयंचलन आणि यंत्रमानवशास्त्र क्षेत्रातील संधी वाढणार आहेत. त्याचप्रमाणे मेडिकल उपकरणे आणि मशिन यांचे डिझाईन आणि उत्पादन या क्षेत्रातदेखील अभियंत्यांना भरपूर वाव असणार आहे. थ्रीडी प्रिंटेड फेस शील्ड, पोर्टेबल व्हेंटिलेटर, प्रतिजैविक मुलामा कुठल्याही पृष्ठभागावर दिला, तर जिवाणू आणि विषाणू मारले जाऊ शकतील. या सर्व कारणांमुळे डिझाईन आणि उत्पादन क्षेत्रातील व्यवसाय संधी निश्चितच वाढणार आहेत. त्यामुळे भविष्यकाळाची दिशा लक्षात घेता मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा एक उत्तम शैक्षणिक पर्याय म्हणून समोर येतो.

(लेखिका जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, हडपसर येथे प्राध्यापक आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: छत्रपतींचा इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

Satara ZP Controversy: सातारा झेडपीतील गोंधळाचे मंत्री गोरेच सूत्रधार: देसाई, मांडवे; आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा होता डाव!

US Iran Conflict : मोठा दिलासा ! गॅस तुटवड्याचं संकट टळणार, इराणने भारतासाठी खुली केली होर्मुझची सामुद्रधुनी

लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये! एप्रिलमध्ये ज्यांना मिळेल लाभ, त्यांचाच सुरु राहणार लाभ; ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी ३१ मार्च मुदत, वाचा...

Panchang 26 March 2026 : दत्त कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT