Prepare for competitive exams only after 10th-12th  Sakal
एज्युकेशन जॉब्स

दहावी-बारावीनंतरच करा स्पर्धा परीक्षेची तयारी

स्पर्धा परीक्षेत जे उमेदवार यशस्वी झाले आहेत, त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

सकाळ वृत्तसेवा

दहावी-बारावी किंवा पदवीच्या वर्गात असतानाच स्पर्धा परीक्षांची तयारी केल्यास यश मिळविणे अधिक सोपे होते. त्यासाठी पूर्वतयारी करायला हवी आणि योग्य वेळी ठामपणे निर्णय घ्यायला हवा. तयारी कशी करायची? यासाठी जाणून घेऊया महत्त्वपूर्ण टिप्स -

तयारीची सुरुवात

जे विद्यार्थी दहावी, बारावीला आहेत, त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत जर एम.पी.एस.सी. किंवा यू.पी.एस.सी.साठी घेण्यात येणाऱ्या फाउंडेशन कोर्सला प्रवेश घेतला, तर त्यांना योग्य दिशा मिळू शकेल.

स्पर्धा परीक्षेत जे उमेदवार यशस्वी झाले आहेत, त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

यशस्वी उमेदवारांची मार्गदर्शनपर व्याख्याने ऐकावीत. त्यांची विविध मासिके, वर्तमानपत्रे, अनियतकालिके यांमधून प्रकाशित झालेल्या मुलाखती वाचाव्यात.

कोणती शाखा निवडाल?

बऱ्याचदा आपल्या पाल्यांना पुढे स्पर्धा परीक्षेसाठी पाठवायचे असल्याने दहावीनंतर कला शाखा निवडायची, की विज्ञान शाखा, असा प्रश्न पडतो. खरे तर विद्यार्थ्यांनी दहावीनंतर विज्ञान शाखेकडे वळावे. यामुळे इंग्रजी सुधारते, त्याचप्रमाणे अधिक अभ्यास करण्याची सवय लागते. बारावीनंतर मात्र ज्यांना भविष्यात स्पर्धा परीक्षा देऊनच करिअर करायचे आहे त्यांनी वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेत शक्यतो वेळ खर्ची घालवू नये.

दहावी, बारावीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली तर निश्चितपणे कोणती ना कोणती नोकरी मग वर्ग-१ असे अथवा वर्ग-२ पदाची नोकरी हमखास मिळू शकते.

जनरल नॉलेज वाढवा

स्पर्धा परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन (जनरल नॉलेज) या विषयावर अधिकाधिक प्रश्न पूर्वपरीक्षेपासून मुख्य परीक्षा व मुलाखतीपर्यंत विचारले जातात. त्यामुळे सामान्य अध्ययन या घटकासाठी पाचवी ते बारावीपर्यंतची सर्व पुस्तके काळजीपूर्वक वाचा.

विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांचे बारकाईने वाचन केले पाहिजे. विशेषत: इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्याचा सराव केला पाहिजे. वर्तमानपत्रातील क्रीडा घडामोडींशी संबंधित पान वाचून त्याच्या नोंदी कराव्यात.

वर्तमानपत्रे ही सामान्य अध्ययनासाठी त्याचबरोबर निबंधासाठी व मुख्य परीक्षेच्या वैकल्पिक विषयांसाठी फार महत्त्वाची भूमिका बजावतात. वर्तमानपत्राचा या परीक्षांसाठी २० ते २५ टक्के वाटा आहे. त्यामुळे लहानपणापासून मुलांना वर्तमानपत्रे वाचण्याबाबत प्रवृत्त केले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat: ७५ वर्षांसंबंधीचं 'ते' विधान भागवतांनी नेमकं का केलं? संघाकडून स्पष्टीकरण, विरोधकांचा मोदींवर रोख

Manchar News : काय सांगता! वृद्ध महिलेचे घरच गेले ‘चोरीला’; न्यायासाठी धावपळ सुरू

Latest Marathi News Updates : नाशिक जिल्हा परिषदेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलंबित

Palghar News: वसई-विरारमध्ये नालासोपाऱ्यात अमली पदार्थांचा पर्दाफाश, 12 आरोपी अटक

IND vs ENG 3rd Test: 'चेंडू'वरून रामायण! शुभमन गिलचं वाद घालणं चुकीचं नव्हतं; अम्पायरने काय केले, ते वाचाच...

SCROLL FOR NEXT