एज्युकेशन जॉब्स

देशात १०० नवीन सैनिक शाळा सुरू करण्याच्या प्रक्रियेला सुरवात

अक्षता पवार

केंद्र सरकारच्या वतीने देशात १०० नवीन सैनिक शाळा सुरू करण्याच्या प्रक्रियेला सुरवात झाली असून देशभरातील विविध शाळांद्वारे सैनिक स्कूल सोसायटीकडे (एसएसएस) या संदर्भात अर्ज देखील पाठविण्यात आले आहे.

पुणे - केंद्र सरकारच्या (Central Government) वतीने देशात १०० नवीन सैनिक शाळा (Army School) सुरू करण्याच्या प्रक्रियेला (Process) सुरवात झाली असून देशभरातील विविध शाळांद्वारे (School) सैनिक स्कूल सोसायटीकडे (एसएसएस) या संदर्भात अर्ज (Form) देखील पाठविण्यात आले आहे. दरम्यान हे होत असताना सैनिक स्कूल सोसायटीद्वारे सैनिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ई-समुपदेशन आयोजित करण्यासाठी स्वयंचलित प्रणाली विकसित करण्यात येत आहे. त्यामुळे सैनिक शाळेत प्रवेशासाठी ई-समुपदेशन पद्धत पहिल्यांदाच सुरू केली जाणार आहे.

सैनिकी शाळेच्या अभ्यासक्रमाबरोबरच राष्ट्रीयशैक्षणिक धोरणाशी सुसंगतपणे वाटचाल करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने या सर्व नविन सैनिक शाळांमध्ये ही प्रणाली वापरली जाईल. यामुळे मर्यादित संख्या असल्याने सैनिक शाळेत योग्य विद्यार्थ्यांची निवड करणे सोपे होईल. सैनिक स्कूल सोसायटी विद्यार्थ्यांना ई-समुपदेशनासाठी अर्जासंदर्भातील माहिती वेळो-वळी देत राहील. एसएसएस तर्फे जाहीर केलेल्या पात्रतेपेक्षा अधिक गुण असणाऱ्या अर्जदार विद्यार्थ्यांना ई-मेल किंवा नोंदणीकृत संपर्क क्रमांकावर लिंक पाठवली जाईल. त्याचवेळी नवीन सैनिक शाळांना श्रेणी आणि लिंगनिहाय माहिती तसेच रिक्त पदांची संख्या उपलब्ध करण्यासाठी योग्य ती संधी प्रदान केली जाईल.

अशी असेल प्रक्रिया

- विद्यार्थ्यांना www.sainikschool.ncog.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी आणि त्यांच्या तपशिलांची पडताळणी करण्यास सांगितले जाईल.

- विद्यार्थ्यांना १० शाळा निवडण्याचा पर्याय असेल

- गुणांच्या आणि त्यांनी निवडलेल्या पर्यायांच्या आधारावर शाळेत प्रवेश

- यासाठी ई-समुपदेशन पोर्टलद्वारे निकाल घोषित केला जाईल

- अर्जदार विद्यार्थ्याला दिलेली शाळा स्वीकारणे आवश्यक

- ज्या विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात आलेल्या शाळांची निवडी स्वीकारल्या असतील त्यांना प्रत्यक्ष पडताळणीच्या तारखा कळविल्या जातील

- पडताळणीनंतर विद्यार्थ्यांचा डेटाबेस तयार होईल

- डेटाबेस अद्ययावत करण्यासाठी शाळांना रिअल टाइम आधारावर ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पर्यायाची निवड नक्की केली आहे, त्यांची यादी दिसेल

- दिलेल्या तारीख आणि वेळेनंतर जागा भरल्या नाहीत तर त्या समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीद्वारे भरल्या जातील

- ज्यांनी पहिल्या फेरीमध्ये जागा स्वीकारल्या नाहीत त्यांना ई-समुपदेशनाच्या दुसऱ्या फेरीत उर्वरित जागा निवडण्याचा पर्याय दिला जाईल

ई-समुपदेशनाचे फायदे -

- प्रवेश प्रक्रियेतील संपूर्ण पारदर्शकता सुनिश्‍चित

- शाळा, विद्यार्थी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी कमी खर्चिक आणि वापरण्यास सोपे

- संपूर्ण प्रक्रियेचे रिअल-टाइम मॉनिटरिंग होईल

- त्यामुळे प्रत्येक टप्प्यावर आवश्‍यक कृती करणे शक्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: "पंतप्रधान मोदी मंगळसूत्र आणि बांगड्यांबद्दल बोलतात, मात्र ऑलिम्पिकपटूंचा लैंगिक छळ होताना ते गप्प असतात," प्रियंकांचा हल्लाबोल

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Rajesh Joshi : नागपूरचे राजेश जोशी आशिया बुकमध्ये; केली सर्वात छोट्या व हलक्या विमानाची निर्मिती

खासदार रेवण्णांची धजदमधून हकालपट्टी होणार?ऐन निवडणुकीत माजी पंतप्रधानांच्या नातवावर अटकेची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT