school start sakal
एज्युकेशन जॉब्स

पुणे : पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग येत्या सोमवारपासून पूर्णवेळ सुरु

पालकमंत्री पवार यांनी शनिवारी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

सकाळ वृत्तसेवा

पालकमंत्री पवार यांनी शनिवारी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

पुणे - पुणे शहर, (Pune City) पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तिसऱ्या लाटेतील कोरोना संसर्गाचे (Corona Infection) प्रमाण कमी झाल्याने, शहर व जिल्ह्यातील इयत्ता पहिली (First) ते आठवीपर्यंतचे वर्ग (Eight Class) येत्या सोमवारपासून (Monday) (ता.७) पूर्णवेळ सुरु करण्यात येणार आहेत. इयत्ता नववी व दहावीचे वर्ग गेल्या आठवड्यापासून पूर्ण वेळ सुरु झाले आहेत. त्यामुळे आता शहर व जिल्ह्यातील सर्व शाळा नियमितपणे पूर्णवेळ सुरु होणार असल्याची घोषणा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी (ता.५) पत्रकारांशी बोलताना केली.

पालकमंत्री पवार यांनी शनिवारी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली. शहर व जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्यानंतर पहिल्यांदा १ जानेवारी २०२२ पासून पहिल्यांदा दोन आठवड्यांसाठी आॅफलाइन शाळा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्य सरकारने या शाळा बंद निर्णयाला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मध्येच २४ जानेवारीपासून शाळा सुरु करण्याची घोषणा केली होती. परंतु पुणे शहर व जिल्ह्यातील संसर्ग कमी झाला नसल्याचे कारण पुढे करत पुण्यातील शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंदच ठेवण्यात येणार असल्याची घोषणा पवार यांनी २२ जानेवारीच्या जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केली होती.

शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सध्या शाळा सुरु करणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय हा २९ जानेवारी रोजी होणाऱ्या कोरोना आढावा बैठकीत घेण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले होते. या घोषणेनुसार पवार यांनी या बैठकीत १ फेब्रुवारी २०२२ पासून इयत्ता नववी व दहावीचे वर्ग पूर्णवेळ तर, इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग अर्धवेळ सुरु करण्यास परवानगी दिली होती. दरम्यानच्या काळात कोरोनाचा संसर्ग आणखी कमी झाल्याचे पाहून पवार यांनी येत्या सोमवारपासून पहिलीपासूचे सर्व वर्ग पूर्णवेळ करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

या कोरोना आढावा बैठकीला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरीचे आयुक्त राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT