Technical Education
Technical Education sakal
एज्युकेशन जॉब्स

करिअर घडविताना : तंत्रशिक्षण : रोजगाराच्या विपुल संधी

सकाळ वृत्तसेवा

स्वातंत्र्यापूर्वी भारतातील अभियांत्रिकी शिक्षण मूलभूत आणि पारंपरिक उद्योगांशी केंद्रित होते.

- राजेश ओहोळ

स्वातंत्र्यापूर्वी भारतातील अभियांत्रिकी शिक्षण मूलभूत आणि पारंपरिक उद्योगांशी केंद्रित होते. इंग्रजी राजवटीतील जलसिंचन, विद्युत, सार्वजनिक बांधकाम, रेल्वे आणि रस्ते या विभागांकरिता अभियांत्रिकी शिक्षणाचे प्रयोजन झाले. दुसऱ्या महायुद्धानंतर शास्त्र आणि तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकास अभूतपूर्व मानावा लागेल. वेगाने संशोधित होणाऱ्या तंत्रज्ञानाचा तंत्रशिक्षणात सातत्याने समावेश करणे क्रमप्राप्त बनले आहे.

स्वातंत्र्यानंतर नियोजित विकासासाठी भारताने मोठ्याप्रमाणात विधायक कार्यक्रम आखले. तंत्रशिक्षणाला बळकटी देऊन देशात तंत्रज्ञ आणि अभियंते निर्माण करणे, हा यापैकी एक विधायक महत्त्वाकांक्षी कार्यक्रम होय. जगात मोठी उच्च शिक्षण प्रणाली असणाऱ्या देशांमध्ये भारताची गणना होणे, हे या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे यश मानावे लागेल. देशातील सामाजिक आणि आर्थिक विकासात तंत्रशिक्षणाची भूमिका वैशिष्ट्यपूर्ण आहे. भारतात कारागीर प्रशिक्षण, पदविका, पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन या स्तरावर तंत्रशिक्षण दिले जाते.

ज्ञान आणि कौशल्यांची सांगड

अभियांत्रिकी शिक्षणात ज्ञान, कौशल्य,आकलन आणि अनुभव यांची व्यवस्थित सांगड घातली आहे. भौतिक क्रियांचे आकलन आणि स्पष्टीकरण विज्ञानामार्फत होते. क्रिया, प्रचिती आणि उपयोजन म्हणजे अभियांत्रिकी पदार्थ विज्ञान आणि अभियांत्रिकी यांच्या जोरावर अंतरिक्ष, संगणक, ऊर्जा आणि संवाद ही मुख्य प्रौद्योगिकी वाहक म्हणून भूमिका बजावत आहेत. जागतिक स्पर्धेत तग धरण्याकरिता अभियंत्यांची कल्पकता आणि कौशल्ये निर्णायक बनली आहेत. वैद्यकीय शाखेप्रमाणे अभियांत्रिकी नियम, सिद्धांत आणि प्रमेयांना धरून कार्य करते. अभियांत्रिकी सरावात विस्तृत स्वरूपाचे ज्ञान आणि कौशल्यांची सांगड असते.

सर्वसमावेशक दृष्टिकोन

शास्त्र तंत्रज्ञानाच्या आंतरविद्याशाखा क्षेत्रांसंबंधित काम असल्याने अभियंत्यांना सदोदित नवीन कौशल्ये अवगत करणे, अपरिहार्य ठरते. तंत्रज्ञानिगडीत समस्या सोडविणारा म्हणून अभियंत्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे. नुसते विश्लेषणीय ज्ञान असूनही चालत नाही. ठराविक कार्यासाठी अपेक्षित असलेले घटक, प्रणाली आणि प्रक्रिया यांचा विकास अभियांत्रिकी डिझाइनद्वारे साधला जातो. अभियांत्रिकी डिझाईनमध्ये गणित, मूलभूत शास्त्र, अभियांत्रिकी शास्त्र व पूरक शिक्षण यांचा वापर होतो. अभियांत्रिकी शाखानिहाय राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय डिझाईन परिमाणे व त्यासंबंधी कायदे अर्थ, आरोग्य, सुरक्षितता, पर्यावरण सामाजिक विचार व इतर महत्त्वाच्या बाबींशी निगडित असतात. तेव्हा मूलभूत शास्त्राद्वारे मिळालेली एखाद्या समस्येची उकल ही पुष्कळदा अभियांत्रिकी व्यवहार्यतेशी सुसंगत राहील असे नसते. सर्वसमावेशक दृष्टिकोन ठेवून नवीन अभियांत्रिकी रचना अथवा डिझाईन हा अभियांत्रिकी शिक्षणाचा आत्मा आहे. कल्पकता, अभ्यासपूर्ण विश्लेषणीय विचारशैली, व्यवहार्यता, कार्य व्यवस्थापन आदी गुणांचा विकास अभियांत्रिकी शिक्षणातून साधला जातो. शास्त्र - तंत्रज्ञानाची व्यापकता प्रचंड मोठी आहे. जीवनाच्या प्रत्येक अंगाशी तंत्रज्ञानाचा जवळचा संबंध येतो. तेव्हा सहाजिकपणे अभियंते व तंत्रज्ञ यांची मागणी सात्यत्याने वाढते आहे. दहावी-बारावीनंतर अभियांत्रिकी शिक्षणाचा पर्याय शास्त्र-तंत्रज्ञानाचे मोठे दालन खुला करणारा आहे. व्यवसायाभिमुख शिक्षण असल्याने रोजगाराच्या संधी विपुल प्रमाणात उपलब्ध होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT