BSF Job google
एज्युकेशन जॉब्स

BSF Job : १०वी उत्तीर्णांची बीएसएफमध्ये भरती; ९२ हजार पगार घेण्याची संधी

या भरतीद्वारे एकूण ४० पदे भरली जातील. उमेदवारांनी १ मार्च २०२३ पूर्वी अर्ज करावा. त्यानंतर अर्ज करण्याची संधी दिली जाणार नाही.

नमिता धुरी

मुंबई : सीमा सुरक्षा दलाने (BSF) सहाय्यक उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल सारख्या अनेक पदांवर भरती सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र असलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन त्यांचा अर्ज सबमिट करू शकतात.

या भरतीद्वारे एकूण ४० पदे भरली जातील. उमेदवारांनी १ मार्च २०२३ पूर्वी अर्ज करावा. त्यानंतर अर्ज करण्याची संधी दिली जाणार नाही.

रिक्त जागांचा तपशील

एकूण पदे - ४०

महत्वाची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख - ३० जानेवारी २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १ मार्च २०२३

शैक्षणिक पात्रता

BSF मध्ये ASI आणि हेड कॉन्स्टेबलच्या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून १०वी पास आणि संबंधित शाखेतून डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

ज्या उमेदवारांना कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे १०वी उत्तीर्ण तसेच आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. पात्रतेबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी, उमेदवार भरती अधिसूचना वाचू शकतात.

वय मर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे असावी. SC, ST आणि इतर राखीव श्रेणीतील उमेदवारांना वयात सवलत दिली जाईल.

अर्ज शुल्क

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

पगार

ASI पदांवर निवडलेल्या उमेदवारांना वेतन मॅट्रिक्स स्तर 5 च्या आधारावर 29,200 ते 92,300 रुपये वेतन दिले जाईल.

हेड कॉन्स्टेबलच्या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल 4 च्या आधारे 25,500 ते 81,100 रुपये वेतन दिले जाईल, तर कॉन्स्टेबलच्या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल 3 नुसार 21,700 ते 69,100 रुपये दिले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT