recruitment esakal
एज्युकेशन जॉब्स

सार्वजनिक आरोग्‍य विभागात भरती; 'असा' करता येईल अर्ज

अरूण मलाणी

नाशिक : राज्यभरात सार्वजनिक आरोग्‍य विभागांतर्गत आरोग्‍य संस्‍थांमध्ये भरती (recruitment) होणार आहे. महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्‍यसेवा ‘गट अ’ संवर्गातील वैद्यकीय अधिकारी सरळ सेवेतून भरती केले जाणार आहेत. या एक हजार १५२ पदांकरिता पात्र उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्यासाठी २१ ऑगस्‍टपर्यंत मुदत दिलेली आहे.

सार्वजनिक आरोग्‍य विभागात एक हजार १५२ पदांवर भरती
सार्वजनिक आरोग्‍य विभागाने यासंदर्भात सविस्‍तर दिशानिर्देश जारी केले आहेत. त्‍यानुसार ऑनलाइन अर्जासोबत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडील वैध नोंदणी प्रमाणपत्रासह विविध चौदा प्रकारची कागदपत्रे अपलोड करायची आहेत. पदांच्‍या संख्येत वाढ किंवा घट होण्याची शक्‍यता असल्‍याचे, तसेच विशेषज्ञ शाखेतील पदव्‍युत्तर पदविका, पदवीधारक उमेदवारांना प्राधान्‍य दिले जाईल, असेही पत्रकात स्‍पष्ट केले आहे. अतिविशेषोपचारतज्‍ज्ञ, बालरोगतज्‍ज्ञ, भिषक, भूलतज्‍ज्ञ, स्‍त्रीरोगतज्‍ज्ञ, शल्यचिकित्सक, कान-नाक-घसातज्‍ज्ञ, नेत्ररोगतज्‍ज्ञ, अस्थिव्‍यंगोपचारतज्‍ज्ञ, त्‍वचारोगतज्‍ज्ञ, शरीरविकृतीतज्‍ज्ञ, रक्‍तसंक्रमण अधिकारी, क्ष-किरणतज्‍ज्ञ, मानसोपचारतज्‍ज्ञ, पीएसएम अशा पंधरा शाखांतील तज्‍ज्ञांची भरती केली जाणार आहे.
प्रचलित नियमानुसार उमेदवाराचे वय ९ ऑगस्टला ३८ वर्षांपेक्षा जास्‍त नसावे. मागासवर्गीय उमेदवारांच्‍या बाबतीत नियमाप्रमाणे वयाची अट शिथिल असेल. अर्ज दाखल करण्याच्‍या प्रक्रियेला सुरवात झालेली आहे.


...असे करता येईल अर्ज
केवळ ऑनलाइन माध्यमातूनच अर्ज करता येणार आहे. सरळ सेवेने पदभरतीसंदर्भातील माहिती http://arogya.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे. अर्ज दाखल करण्यासाठी http://www.maha-arogya.in/application_form.aspx या संकेतस्‍थळाला भेट द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune: कामासाठी इमारतीमध्ये गेले; पण कुत्रा मागे लागला अन्...; सारंच संपलं! पुण्यात 'त्या' इलेक्ट्रिशियनसोबत काय घडलं?

Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई

Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीच्या जवळ बंद; सेन्सेक्स तब्बल 446 अंकांनी वाढला; हे शेअर्स फायद्यात!

Latest Marathi News Update LIVE : अनिल देशमुखांच्या मुलाचा शरद पवार गटाला रामराम

Pune Municipal Election : पुण्यात ३५ लाख ५१ हजार मतदार! १० प्रभागातील मतदार संख्या लाखाच्या पुढे, प्रचारात उमेदवारांची होणार दमछाक

SCROLL FOR NEXT