Ichalkaranji Firing News : इचलकरंजीत पोलिसादेखत गुंडावर गोळीबार, भरवस्तीत प्रकाराने एकच धावाधाव; जखमी सांगलीचा; हल्लेखोर पसार

Gangster shot in Ichalkaranji : इचलकरंजी शहरात पोलिसांसमोरच गुंडावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली. भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यात सांगलीतील युवक जखमी असून हल्लेखोर फरार झाले आहेत.
firing incident in Ichalkaranji

firing incident in Ichalkaranji

esakal

Updated on

Ichalkaranji crime news : अपर पोलिस अधीक्षक कार्यालयातून पोलिसांसोबत बाहेर पडलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर आज भररस्त्यात रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडण्यात आली. गोळी उजव्या बरगडीत खोलवर घुसल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ओंकार जितेंद्र कांबळे (वय २२, रा. समता चौक, सांगलीवाडी, जि. सांगली) असे जखमीचे नाव आहे. प्रकृती चिंताजनक बनल्याने त्याला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com