bank-of-india
bank-of-india Gallery
एज्युकेशन जॉब्स

Bank of India मध्ये विविध पदांची भरती! दहावी ते पदवीधरांना संधी

श्रीनिवास दुध्याल

बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी आहे.

सोलापूर : बॅंक ऑफ इंडियामध्ये (Bank Of India)) नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची (Government Job) संधी आहे. बॅंक ऑफ इंडियाने इंदूर झोनमध्ये कृषी, वित्त व वित्तीय समावेशन विभाग अंतर्गत रूरल सेल्फ इम्प्लॉयमेंट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्‌स (Rural Self Employment Training Institutes - RSETI), बरवानी आणि धरकरिता विविध सहाय्यक कर्मचारी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. 16 ऑक्‍टोबर 2021 रोजी बॅंकेने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार, RSETI, बरवानीमध्ये फॅकल्टी, ऑफिस असिस्टंट, अटेंडेंट व वॉचमनची पाच पदे तसेच RSETI, धरसाठी याच पदांच्या 6 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ही सर्व पदे कराराच्या आधारावर भरती (Recruitment) केली जाणार आहेत.

भरतीसाठी अर्ज प्रक्रिया

इच्छुक उमेदवार बॅंकेच्या अधिकृत वेबसाईट bankofindia.co.in वर दिलेल्या लिंकवरून भरती अधिसूचना डाउनलोड करू शकतात. अर्जाचा फॉर्म भरती अधिसूचनेतच दिला आहे. हा फॉर्म पूर्णपणे भरा व आवश्‍यक कागदपत्रे जोडा आणि 29 ऑक्‍टोबर 2021 रोजी दुपारी 4 वाजता झोनल मॅनेजर, बॅंक ऑफ इंडिया, कृषी वित्त आणि वित्तीय समावेशन विभाग, 9 आरसी स्कीम क्र. 134, एमआर 10 बायपासजवळ, इंदूर -452010 या पत्त्यावर जमा करा.

भरतीसाठी पात्रता व निकष

  • फॅकल्टी : बॅचलर पदवी. डिप्लोमा इन व्होकेशनल कोर्स आवश्‍यक. एमएस ऑफिस आणि इंटरनेट चालवण्यास सक्षम. हाऊस फॅकल्टी किंवा व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून 2 वर्षांचा अनुभव. वयोमर्यादा : 1 ऑक्‍टोबर 2021 रोजी 25 वर्षे ते 63 वर्षे.

  • ऑफिस असिस्टंट : बॅचलर पदवी आणि संगणकाचे ज्ञान. एमएस ऑफिस, टॅली आणि इंटरनेट चालवण्यास सक्षम. स्थानिक भाषेची माहिती. 1 ऑक्‍टोबर 2021 रोजी वयोमर्यादा 18 वर्षे ते 43 वर्षे.

  • अटेंडंट : किमान दहावी पास. वयोमर्यादा : 1 ऑक्‍टोबर 2021 रोजी 18 ते 63 वर्षे.

  • वॉचमन : किमान आठवी पास. वयोमर्यादा : 1 ऑक्‍टोबर 2021 रोजी 18 वर्षे ते 63 वर्षे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dabholkar Murder Case: डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना काय होणार शिक्षा? दहा वर्षांच्या प्रतिक्षेनंतर येणार निकाल

Latest Marathi News Live Update : तब्बल 10 वर्षांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा आज निकाल

T20 World Cup स्पर्धेसाठी संघात संधी न मिळताच स्फोटक फलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती; अनेक विक्रम आहेत नावावर

Loksabha Election : बॉँबस्फोटातील आरोपी प्रचारात ; भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका

Sakal Podcast: नाशिक लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा ते हरियाणात बहुमत चाचणीची मागणी

SCROLL FOR NEXT