New teacher  Sakal
एज्युकेशन जॉब्स

सहाय्यक प्राध्यापकांच्या 1091 पदांसाठी भरती! जाणून घ्या सविस्तर

सहाय्यक प्राध्यापकांच्या 1091 पदांसाठी भरती! जाणून घ्या सविस्तर

श्रीनिवास दुध्याल

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. त्यानंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना समुपदेशनासाठी बोलावले जाईल.

सोलापूर : जर तुम्ही अध्यापन (Teacher) क्षेत्रात नोकरी (Job) शोधत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पंजाबच्या उच्च शिक्षण विभागाने (Department of Higher Education - DHE) सहाय्यक प्राध्यापक आणि ग्रंथपाल पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. यानुसार एकूण 1158 पदांची भरती केली जाईल. यापैकी 1091 सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी आणि 67 ग्रंथपाल पदांसाठी आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार Educationrecruitmentboard.com वर अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 नोव्हेंबर 2021 आहे.

रिक्त पदांचा तपशील

कृषी - 1, जैव रसायनशास्त्र - 1, वनस्पतिशास्त्र - 39, रसायनशास्त्र - 41, वाणिज्य - 70, संगणक विज्ञान - 56, अर्थशास्त्र - 53, इतिहास - 73, गृह विज्ञान - 9, फलोत्पादन - 1, गणित - 73, शारीरिक शिक्षण - 54 , भौतिकशास्त्र - 47, समाजशास्त्र - 14, प्राणीशास्त्र - 40, नृत्य - 2, शिक्षण - 3, पर्यावरण विज्ञान - 3, इंग्रजी - 154, ललित कला - 10, भूगोल - 43, हिंदी - 30, वाद्य - 7, संगीत गायन - 10, तत्त्वज्ञान - 6, मानसशास्त्र - 12, लोक प्रशासन - 32

DHE ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्यांकडे 55 टक्के गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्‍यक आहे. तसेच, अर्जदारांनी NET/SLET/SET यामध्ये पात्र असणे आवश्‍यक आहे. परीक्षेच्या कालावधीत उमेदवारांना दरमहा 56,100 वेतन दिले जाईल.

अर्जाचे शुल्क

एससी, एसटी उमेदवारांना 750 रुपये शुल्क भरावे लागेल तर माजी सैनिकांना 500 रुपये शुल्क भरावे लागेल. त्याच वेळी, EWS आणि PWD अर्जदारांना 500 शुल्क भरावे लागेल. याशिवाय इतर अर्जदारांना 1500 रुपये भरावे लागतील.

अशा प्रकारे होईल निवड

सहाय्यक प्राध्यापक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड लेखी परीक्षेच्या आधारे केली जाईल. त्यानंतर शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना समुपदेशनासाठी बोलावले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : कोकण, घाटमाथा, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’; उर्वरित कोकण, विदर्भात जोरदार पाऊस शक्य

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

MS Dhoni Birthday: धोनी का आहे दिग्गज खेळाडू, याची साक्ष देणारे हे रेकॉर्ड्स माहित आहेत का?

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

SCROLL FOR NEXT