Jobs
Jobs Sakal
एज्युकेशन जॉब्स

नोकरी, बाजारपेठ : नवी दृष्टी आणि अभ्यासाची तयारी देईल उत्तम जॉब!

सकाळ वृत्तसेवा

जगभरात सध्या जमिनीवरील कार्बनीकरण कमी करण्याबाबत चर्चा होताना दिसते. कमी कार्बन उत्सर्जित करणारे जैवइंधनाचे विविध पर्याय शोधले जात आहेत.

- सचिन रावळे

जगभरात सध्या जमिनीवरील कार्बनीकरण कमी करण्याबाबत चर्चा होताना दिसते. कमी कार्बन उत्सर्जित करणारे जैवइंधनाचे विविध पर्याय शोधले जात आहेत. त्यामुळे जैव अर्थव्यवस्थेला त्यातील प्रयोगांना विशेष महत्त्व येत आहे. कोणत्याही देशाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी ऊर्जा आणि त्याचे वेगवेगळे पर्याय महत्त्वाचे असतात. पर्यावरणाविषयीची चिंता सर्वत्र व्यक्त केली जात असल्याने सध्या जैवइंधने आणि त्यांच्या घटकांवर मोठ्याप्रमाणावर काम होताना दिसते. त्यामुळे जैव इंधनांनी उत्पादन आणि विक्री या दोन्हीची बाजारपेठ काबीज केली असून जैवतंत्रज्ञान क्षेत्राचा परीघ, नोकरी, व्यवसाय, संशोधन यांच्या संधी वाढणार आहेत.

अशी करा मुलाखतीची तयारी

1) जगभरात जैवतंत्रज्ञानाशी संबंधित संस्थांच्या जसे की Dept of Biotechnology, Association of Biotechnology Led Enterprises, World BioEconomy Forum संकेतस्थळांचा अभ्यास करावा. या क्षेत्रात सुरू असणारे संशोधन, प्रयोग, ट्रेंड आदींची माहिती मिळेल.

2) जैवतंत्रज्ञानाशी संबंधित मासिके तसेच अहवालांचा जसे की Folicht, Biofuels Digest, International Energy Agency आदींचा अभ्यास करावा.

3) जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर कंपन्यांचा अभ्यास करावा. प्राजसह जगभरात विविध कंपन्या या क्षेत्रात काम करीत आहेत.

4) जैवतंत्रज्ञानाला पुढे नेणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती घ्यावी.

5) जैवतंत्रज्ञानापासून उभारलेल्या प्रकल्पांना प्रत्यक्ष भेटी देऊन माहिती घ्यावी. यातून दृष्टी मिळेल. कंपन्यांची नेमकी काय. गरज आहे आणि आपल्याला काय तयारी करावी लागेल याचा त्यामुळे अंदाज येईल.

6) हे क्षेत्र निवडण्यामागचं उत्तर तयार असल्यास तुमचा आत्मविश्वास वाढेल.

ही स्किल हवीत...

एखादा उमेदवार मुलाखतीसाठी येतो तेव्हा त्याच्यात विविध स्किल पाहिली जातात ‌. जसे की,

1) त्याचा दृष्टिकोन आणि या क्षेत्रात काम करण्यास तो किती उत्सुक आहे.

2) त्याची संभाषण कला आणि आत्मविश्वास.

3) शैक्षणिक पात्रता आणि कोणत्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेत शिक्षण पूर्ण केले आहे. हा महत्त्वाचा घटक असतो.

4) प्रत्यक्ष प्रकल्पावर काय काम केलंय आणि त्यातून काय शिकायला मिळालं. त्यामुळे सुरवातीला मिळालेल्या प्रत्येक संधीचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा.

5) जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील शब्दप्रयोग कितपत अवगत आहेत.

6) जगभरात या क्षेत्रात सुरू असलेल्या ताज्या घडामोडींची कितपत माहिती आहे.

शिक्षण पद्धतीत हवेत बदल

उद्योग आणि शिक्षण यांची बरेचदा सांगड नसते. उद्योगांना कुशल मनुष्यबळासाठी आवश्यक असणाऱ्या स्किल अनेकदा अभ्यासक्रमात शिकवल्या जात नाहीत. त्यामुळे या दोघांनी परस्परांमधील समन्वय वाढवण्याची गरज आहे.

1) दोन्ही क्षेत्रातील ज्ञानाची देवाण-घेवाण वाढली पाहिजे.

2) शैक्षणिक संस्थांना मूलभूत, सैद्धांतिक पैलू आणि नवीन घडामोडी यांची माहिती असावी. उद्योगांनी या क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडींची माहिती, गरज शिक्षण संस्थांपर्यंत पोचवावी.

3) शैक्षणिक संस्थांनी या क्षेत्रामध्ये घडणाऱ्या घडामोडींप्रमाणे आपल्या अभ्यासक्रमात बदल करावेत. त्यासाठी दोघांनी परस्परांमधील संवाद वाढवायला हवा.

4) उद्योग आणि शिक्षण यांनी संयुक्त प्रकल्प करावेत.

5) रोजगाराभिमुख शिक्षणपद्धती अंगीकारावी.

(लेखक प्राज इंडस्ट्रीजचे सीएफओ आणि डायरेक्टर (ह्यूमन रिसोर्स) आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT