Sakal Vidya Edu Expo sakal
एज्युकेशन जॉब्स

Sakal Vidya Edu Expo : सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोला बारामतीकरांचा उदंड प्रतिसाद...

विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याच्या उद्देशाने करिअरच्या विविध क्षेत्राची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याचा सकाळ माध्यम समूहाचा प्रयत्न

मिलिंद संगई, बारामती.

बारामती - विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याच्या उद्देशाने करिअरच्या विविध क्षेत्राची माहिती एकाच छताखाली उपलब्ध करुन देण्याचा सकाळ माध्यम समूहाचा प्रयत्न प्रशंसनीय आहे, असे गौरवोदगार बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी काढले.

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आचार्य अँकेडमी प्रस्तुत व एस.बी. पाटील विकास प्रतिष्ठान, इंदापूर व पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकार्याने आयोजित सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो 2023 चे शनिवारी (ता. 10) बारामतीत विविध मान्यवरांच्या हस्ते उदघाटन झाले, त्या प्रसंगी नावडकर बोलत होते.

अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, करिअर मार्गदर्शक हेमचंद्र शिंदे,

आचार्य अँकेडमीचे संस्थापक संचालक ज्ञानेश्वर मुटकुळे, एस.बी. पाटील इंदापूरचे यशवंत यादव, दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख रामदास झोळ, पुणे जिल्हा बँकेचे संदीप जगताप, शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त अनिल जगताप,

रविंद्र थोरात, वसंतराव तावरे, सचिव प्रमोद शिंदे, एस.बी. पाटील विकास प्रतिष्ठानचे डॉ. यशवंत यादव, गौरव गुंदेचा, रणजित शिंदे, डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. अविनाश जगताप, वैशाली माळी, राजीव निमकर, राजेंद्र वाबळे, डॉ. नागेश गवळी, सूर्यकांत सावंत, गणेश खरात, राजेंद्र पाटील, डॉ. शिवाजी मोरे, विनोद रावळ, एन.वाय. फाऊंडेशनचे देवकर, आदी उपस्थित होते.

करिअरची दिशा ठरविण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांसह विविध शैक्षणिक संस्थांमध्ये समन्वय साधण्याच्या उद्देशाने सकाळ माध्यम समूहाने सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पोचे आयोजन केले आहे.

या प्रसंगी आनंद भोईटे, हनुमंत पाटील, सचिन सातव, ज्ञानेश्वर मुटकुळे व संदीप जगताप यांनी मनोगतामध्ये सकाळच्या शैक्षणिक उपक्रमाची प्रशंसा केली. स्पर्धा वाढते तशीच गुणवत्ताही वाढीस लागते, त्या मुळे स्पर्धेला सकारात्मक रितीने घेतले पाहिजे, असे आनंद भोईटे यांनी नमूद केले. कल्याण पाचांगणे यांनी सूत्रसंचालन केले.

स्तुत्य उपक्रम....

मी करमाळा येथून आलो आहे सकाळ ने बारामती शहर परिसरात शिक्षण संस्था एकत्रित आणल्या आहेत त्यामुळे परिसरातील शिक्षण संस्थांचे पूर्ण माहिती मला मिळाली वेळ आणि पैसा याची बचत झाली सकाळचा हा स्तुत्य उपक्रम आहे असे मला वाटते- बाळासाहेब गाडे (पालक) करमाळा.

मला शास्त्रज्ञ व्हायचे आहे हे माझे स्वप्न आहे. मी बारामती येथे सकाळ एक्स्पोला भेट दिली. या ठिकाणी मला अनेक अभ्यासक्रमांबद्दल माहिती मिळाली. या ठिकाणी अनेक क्षेत्र आपल्यासाठी खुले आहेत, याची सविस्तर माहिती मला मिळाली. नक्कीच माझ्या भविष्यासाठी मला हा शैक्षणिक उपक्रम उपयुक्त ठरेल- सानिका शरद जोगडे, ( इयत्ता दहावी विद्यार्थिनी) उस्मानाबाद.

बारामती एक्स्पो मध्ये सहभागी संस्था.....

• आचार्य अॅकडमी

• एस बी पाटील विकास प्रतिष्ठान इंदापूर

• पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

• अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती.

• दिशा अकॅडमी, बारामती..

• एक्सलन्स सायन्स अकॅडमी, बारामती.

• तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती.

• तिरंगा ॲनिमेशन कॉलेज, बारामती.

• शिवनगर विद्या प्रसारक मंडळ, माळेगाव.

• ट्वेल स्कूल हॉटेल मॅनेजमेंट, बारामती.

• दत्तकला शिक्षण संस्था, भिगवण.

• आदर्श पॅरामेडिकल कॉलेज, बारामती.

• सारसम कॉलेज ऑफ फार्मसी, बारामती.

• लडकत सायन्स अकॅडमी, बारामती.

• बारामती सहकारी बँक, बारामती.

• बारामती कॉलेज ऑफ फार्मसी, बारामती.

• कार्व्हर ट्रेनिंग अँड सर्व्हिसेस प्रा.लि. बारामती

• राज पॅटर्न, बारामती.

• एन वाय फाऊंडेशन, बारामती.

• आत्मी एज्युकेशन, बारामती.

रविवारी (ता. 11) अशी असतील चर्चासत्रे (स्थळ- चिराग गार्डन, बारामती)

• रिटेल मॅनेजमेंट- महेश फुले, टीसी कॉलेज, बारामती- दुपारी साडेचार वाजता

• वैमानिक प्रशिक्षणातील संधी- शिवानी पोतेकर, कार्व्हर एव्हीएशन बारामती. संध्याकाळी पाच वाजता

• करिअर कसे निवडावे- सुमीत शिनगारे, संचालक, आचार्य अँकेडमी- संध्याकाळी साडेपाच वाजता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT