Satara Latest Marathi News 
एज्युकेशन जॉब्स

आर्ट्समध्ये करिअर झालंय?; नोकरीच्या हमखास संधी, पगारही मिळणार लाखोंमध्ये!

Balkrishna Madhale

सातारा : Career in Arts Stream : कला शिक्षण क्षेत्रात देखील विद्यार्थ्यांना चांगले करिअर करण्याची संधी आहे. बर्‍याच वेळा आर्ट्स विद्यार्थी इतर प्रवाहामधील विद्यार्थ्यांपासून स्वतःला कमी लेखतात. पण, जर आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी योग्य कोर्स निवडला असेल, तर त्यांनाही चांगली नोकरी मिळू शकेल आणि तेही चांगले करिअर बनवू शकतील. याच आर्ट्स क्षेत्राबद्दल आम्ही तुम्हाला योग्य माहिती देणार आहोत..

कला विषयात पदवी घेतल्यानंतर 'या' क्षेत्रात करा करिअर

वकील - कला शाखेचे विद्यार्थी पदवीनंतर मोठ्या संख्येने कायद्याचा अभ्यास करतात. एलएलबी अभ्यासक्रम देशातील अनेक बड्या विद्यापीठांत घेतले जातात आणि या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षाही घेण्यात येतात. यात आपण सीएलएटी परीक्षेची तयारी करू शकता, त्यानंतर तुम्हाला देशातील सर्वोच्च कायदा महाविद्यालयात प्रवेश मिळेल.

फॅशन आणि टेक्सटाईल डिझाइन - आपल्याला या क्षेत्रात रस असेल, तर आपण दोन वर्षांचा पीजी कोर्स करू शकता. यात 1 वर्षाचा डिप्लोमा आणि 2 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम आहे. कोर्सबाबत प्रत्येक संस्थेचा स्वतःचा वेगळा निकष असू शकतो.

शिक्षक - बहुतेक कला शाखेच्या विद्यार्थ्यांच्या यादीत अव्वल स्थानावर असलेला हा कोर्स आहे. यासाठी बीएड कोर्समध्ये प्रवेश घ्यावा लागेल किंवा एमए केल्यानंतर नेट क्लीअर करावे लागेल. बीएड केल्यावर तुम्ही कोणत्याही शाळांमध्ये शिकवू शकता. तसेच, नेट क्लिअर केल्यावर तुम्ही महाविद्यालयात शिक्षक पदांसाठी अर्ज करण्यास पात्र असाल.

हॉटेल मॅनेजमेंट - हॉटेल उद्योगाची देशातच नव्हे, तर परदेशातही नेहमीच व्याप्ती वाढलेली दिसत आहे. हॉटेल उद्योगाशी संबंधित अनेक अभ्यासक्रम आर्ट्स ग्रॅज्युएटद्वारे करता येतात. या अभ्यासक्रमाचा प्रत्येक संस्थेचा स्वतःचा वेगळा निकष असतो. या क्षेत्रात तुम्ही आर्ट्स ग्रॅज्युएट डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेन्ट, एमबीए टूरिझम इत्यादी करू शकता.

सरकारी नोकरीची तयारी - प्रत्येकाला सरकार नोकरी करण्याची इच्छा असते. यासाठी आपण यूपीएससी किंवा एसएससी नोकरीसाठी अर्ज करू शकता. शिवाय इतर कोणत्याही सरकारी संस्थेच्या नोकरीसाठी तयारी करू शकता. जर तांत्रिक आणि विशेष क्षेत्रातील नोकऱ्या सोडल्या, तर बहुतेक सरकारी नोकऱ्यांसाठी पदवीच्या शिक्षणाची आवश्यकता असते.

या व्यतिरिक्त 'हे' अभ्यासक्रम देखील लोकप्रिय

  • पत्रकारिता (जर्नालिझम)
  • अनिमेशन
  • फॉरेन लॅंगवेज एक्सपर्ट
  • एमबीए
  • एव्हेंट मॅनेजमेंट
  • रिटेल आणि फॅशन कोर्स
  • ग्राफिक डिझायनर
  • शेअर मार्केट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDW vs AUSW Live: भारतीय संघाचे T20 World Cup मधून पॅकअप! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय अन् दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीत... हरमनप्रीत कौरच्या संघाला अपयश

IND vs IRE 2nd T20I : आयर्लंडने इतिहास रचला! भारतीय संघाला ट्वेंटी-२० मालिकेत नमवले, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाची लाजीरवाणी सुरुवात

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाढला मृत्यूचा धोका! टोल टाळण्यासाठी 'नो-एंट्री'तून वाहनांची सर्रास एंट्री; नियमांना हरताळ

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Vidarbha Rain Alert : विदर्भासाठी दिलासादायक बातमी! पावसाचा जोर वाढणार, ११ जिल्हे यलो अलर्टवर

SCROLL FOR NEXT