sppu vice chancellor dr parag kalkar  sakal
एज्युकेशन जॉब्स

Pune University : प्र-कुलगुरूंच्या निवडीवर कॉंग्रेसचा आक्षेप; नियुक्ती रद्द करण्याची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू नियुक्ती वादात

सम्राट कदम

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू नियुक्ती वादात सापडण्याची शक्यता आहे. नवनियुक्त प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला असून, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ही नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची नियुक्ती होत असेल तर हे अतिशय गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. डॉ. काळकर यांच्या नियुक्तीनंतर दुसऱ्याच दिवशी वडेट्टीवार यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.

त्यांनी याबाबत ट्विट करत म्हटले आहे,‘‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट असा नावलौकिक असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र - कुलगुरू पदी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करून नेमके काय साध्य करायचे आहे?

ही नियुक्ती राजकीय दबावातूनच झाली असून, ती तात्काळ रद्द करण्यात यावी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला ऐतिहसिक पार्श्वभूमी आहे. चरित्र जोपासने हे विद्यापीठाचे काम आहे.’’ डॉ. काळकर हे विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता होते. २०१७ ते १८ या कालावधीत त्यांनी आर्थिक गुन्हे केले होते.

पिंपरी चिंचवड येथील पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे त्याच्यांवर दाखल आहेत. असे असताना कुठलीही शहानिशा न करता, ही नियुक्ती कशी झाली? हा गंभीर प्रश्न आहे. अशाच नियुक्त्या करायच्या असतील तर संपूर्ण प्रक्रिया राबविण्याची गरजच काय? राजकीय नियुक्त्या असतील तरी थोडी खातरजमा करून त्या केल्या जाऊ शकतात. पण, अशा नियुक्त्या करून आपण जनतेला काय संदेश देऊ इच्छितो?, असेही वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Pakistan Tensions : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका!

Midday Meal Egg Controversy : मध्यान्ह भोजनात अंडे देण्यावरून वाद...एकाच वेळी ७० पालकांनी मुलांना शाळेतून काढलं

VIRAL VIDEO: ए काय करतोयस? सेल्फी घेणाऱ्याला जया बच्चन यांनी दिला जोराचा धक्का; सगळेच अवाक, नेटकरी म्हणतात- त्याला...

Latest Maharashtra News Updates Live: वैद्यनाथ बँकेवर पंकजा मुंडेंचंच वर्चस्व

मृत्यूच्या दाढेतून परत आलेली सचिन यांची एकुलती एक लेक; "डॉक्टरांनी ती टेस्ट सांगितल्यावर मी हादरलो.."

SCROLL FOR NEXT