exam esakal
एज्युकेशन जॉब्स

दहावी-बारावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट कधी मिळणार ?

मंडळाकडून नियोजनासाठीची घोषणा लवकरच

संजीव भागवत

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी, बारावीच्या परीक्षा (ssc-hsc exam) या ऑफलाईन पद्धतीने (offline exam) घेण्याचा ठाम निर्णय मंडळाने घेतल्यानंतर आता या परीक्षांची तयारी सुरू केली आहे. बारावीच्या १४ फेब्रुवारीपासून तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा (Practical exam) सुरू होणार असल्याने त्यापूर्वीच विद्यार्थ्यांना त्यांचे हॉलतिकिट (hall ticket) उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी (sharad gosavi) यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.

राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दहावीच्या लेखी परीक्षा या१५ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत तर त्यापूर्वी श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन आदी परीक्षा या २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत घेतल्या जाणार आहेत.

बारावीच्या लेखी परीक्षाची सुरूवात ही ४ मार्च रोजी होऊन त्या ३० मार्चपर्यंत चालणार आहेत, तर श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन या परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्च कालावधी होणार आहेत या परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षांचे हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाकडून तयारी केली जात असून त्यासाठी लवकरच माहिती जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

दारुबंदी साठी महिलांचे आंदोलन सुरु असताना पती नशेत पोहोचला, पत्नीचे शिकवला कायमचा धडा

गिरगावच्या हाय-प्रोफाईलचं धक्कादायक वास्तव समोर, फक्त मराठी अभिनेत्री नाहीतर बॉलिवूड अभिनेत्रीचा झालेला सौदा

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

SCROLL FOR NEXT