maharashtra state borad hsc exam result 2023 date and time announced 25 may 2023 at 2 pm online
maharashtra state borad hsc exam result 2023 date and time announced 25 may 2023 at 2 pm online esakal
एज्युकेशन जॉब्स

SSC and HSC Exam : दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

सकाळ वृत्तसेवा

पुणे - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर १७ भरून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अतिविलंब शुल्काने अर्ज भरण्यासाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२४ परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांचे नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीने विलंब शुल्काने १५ ऑक्टोबरपर्यंत आणि अतिविलंब शुल्काने ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्याच्या तारखा निश्चित केल्या होत्या. परंतु त्यानंतर अतिविलंब शुल्काने अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

इयत्ता दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी प्रति विद्यार्थी प्रतिदिनी वीस रुपये देऊन नाव नोंदणी अर्ज सादर करू शकणार आहे. विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज दहावीच्या परीक्षेसाठी ‘http://form17.mh-ssc.ac.in’ आणि बारावीच्या परीक्षेसाठी ‘http://form17.mh-hsc.ac.in’ या संकेतस्थळावरून भरायचा आहेत, अशी माहिती राज्य मंडळाने दिली आहे.

खासगी विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी नावनोंदणी अर्ज ऑनलाइन पद्धतीनेच भरायचे आहेत. त्यामुळे कोणाचाही ऑफलाइन अर्ज स्वीकारला जाणार नाही. तसेच परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाइनद्वारे देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांनी अर्जासोबत छाननीसाठी दिलेली मूळ कागदपत्रे माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाकडून दिलेल्या कालावधीनंतर परत घेऊन जाण्याची दक्षता घ्यावी.

पात्र विद्यार्थ्यांना नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर त्यांनी परीक्षेची आवेदनपत्रे मंडळाने दिलेल्या कालावधीत परीक्षा शुल्कासह भरणे आवश्यक आहे. खासगी विद्यार्थ्यांना अतिविलंब शुल्काने नावनोंदणी करण्यासाठी ७ नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे. यानंतर कोणत्याही प्रकारे मुदतवाढ दिली जाणार नाही, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे स्पष्ट केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT