ssc result 2023 maharashtra ssc result will declared know how to check result on mahresult nic in edication sakal
एज्युकेशन जॉब्स

SSC Exam Result 2023 : दहावीचा आज निकाल ; तुमचा निकाल सर्वात आधी पाहण्यासाठी 'येथे' क्लिक करा

बारावीच्या निकालानंतर सगळ्यांना प्रतीक्षा होती ती दहावीच्या निकालाची. राज्यातील लाखो विद्यार्थी-पालकांची ही प्रतीक्षा आता संपली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : बारावीच्या निकालानंतर सगळ्यांना प्रतीक्षा होती ती दहावीच्या निकालाची. राज्यातील लाखो विद्यार्थी-पालकांची ही प्रतीक्षा आता संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. २) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच निकाल तुलनेने लवकर जाहीर होत आहे.

राज्य मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेसाठी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यामध्ये आठ लाख ४४ हजार ११६ विद्यार्थी आणि सात लाख ३३ हजार ६७ विद्यार्थिनी आहेत. एकूण २३ हजार १० माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

राज्यात पाच हजार ३३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित केली होती. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा निकाल राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन जाहीर होणार आहे.

विद्यार्थ्यांनी विषयनिहाय मिळविलेले गुण संकेतस्थळावर उपलब्ध होतील, तसेच त्यांना त्या माहितीची प्रत घेता येईल. राज्य मंडळाच्या ‘www.mahresult.nic.in’ या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाची सांख्यिकी माहिती उपलब्ध होणार आहे.

तर ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल. ऑनलाइन निकालानंतर दहावीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात विद्यार्थ्याने मिळविलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ‘http://verification.mh-ssc.ac.in’ या अधिकृत संकेतस्थळावरून स्वत: किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.

परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीनुसार शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळांकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासंदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळांकडे विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा. परीक्षेत सर्व विषयांसह उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लगतच्या दोनच संधी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहणार आहेत. पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी आणि श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी ७ जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून घेण्यात येतील. त्याबाबत स्वतंत्रपणे परिपत्रक काढण्यात येईल, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Political: इम्रान खान यांच्या बहिणीला घरातून ताब्यात घेतले; आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात कारवाई

Amravati College Student Case : कॉलेज तरुणीला वेगवेगळ्या हॉटेलमध्ये नेत ठेवले संबंध, फोटो व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; १ लाख ३२ हजार हडपले

Western Vidarbha Crop Damage : पावसाच्या खंडाने पिके संकटात शेतकऱ्यांना भरीव मदतीची ग्वाही; मुदतपूर्व पीक पाहणी पूर्ण करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये गणरायाचे विसर्जन करताना Engineering च्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सचा कस लागणार; लवलिना-नरेंद्रची थेट उपांत्यपूर्व फेरीत सुरुवात

SCROLL FOR NEXT