MPSC
MPSC Sakal
एज्युकेशन जॉब्स

डीवायएसपी, एसीपीचा पर्याय निवडताना ताण

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) (MPSC) घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी (Main Exam) अर्ज (Form) सादर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज सादर करताना पोलिस उपअधीक्षक/ सहायक पोलिस आयुक्त (डीवायएसपी /एसीपी) (DYSP / ACP) या पदासाठी छातीच्या रकान्यात बदल करण्यास अडचण येत आहे. त्यामुळे या पदाचा पर्याय निवडता येत नसल्याने विद्यार्थी (Students) तणावात (Tension) आले आहेत. परीक्षेला (Exam) अर्ज सादर करण्याची तारीख १४ एप्रिल असल्याने ही अडचण दूर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना विद्यार्थ्याच्या अर्जात काही त्रुटी राहिली असल्यास अथवा काही बदल करावयाचे असतील तर मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करताना त्यात बदल करता येतो. तसे एमपीएससीने देखील सूचनेत जाहीर केले आहे. पूर्व परीक्षेचा अर्ज सादर करताना पुरुषांसाठी असलेल्या छातीच्या रकान्यात छाती न फुगवता व फुगवल्यानंतरचे माप भरावे लागते. त्यावेळी विद्यार्थी त्याच्या शरीर रचनेनुसार मापाची माहिती देतात. मात्र आता नव्याने अर्जात बदल केला असता तो होत नाही. त्यामुळे राज्यातील सुमारे ५०० ते ६०० विद्यार्थ्यांना या पदाचा पर्याय निवडण्यास अडथळा येत आहे.

या बाबत एमपीएपीएससीच्या अधिकृत मेल आयडीवर मेल केले, तसेच संपर्क साधला असता, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. उलट पूर्व परीक्षेला अर्ज करताना जी माहिती भरली होती, तीच माहिती पुढे राहील. असे सांगण्यात आले. त्यामुळे एमपीएससीने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन आवश्यक बदल करण्याची परवानगी द्यावी, अशी माऊली जाधव या विद्यार्थ्याने मागणी केली आहे.

व्यावसायिक व्यक्तीकडून माझ्या छातीचा आकार मोजला आहे. नियमानुसार मी या पदासाठी पात्र आहे. एखाद्या व्यक्तीचे शारीरिक मोजमाप बदलण्याची शक्यता असते. व्यायामाने छातीच्या आकारात बदल होत असतो, त्यामुळे आवश्यक तो बदल करण्याची एमपीएससीने परवानगी द्यावी.

- हर्षल येवले, विद्यार्थी

विद्यार्थ्यांना अर्ज भरताना काही अडचणी येत असल्यास मेल करावा. किंवा थेट संपर्क साधावा. एमपीएससीकडून सर्व सहकार्य केले जाईल. विद्यार्थ्यांनी काळजी करू नये.

- किशोर राजेनिंबाळकर, अध्यक्ष, एमपीएससी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT