‘ओन्ली एमपीएससी’साठी विद्यार्थ्यांचे ‘ट्विटर’वर आंदोलन
‘ओन्ली एमपीएससी’साठी विद्यार्थ्यांचे ‘ट्विटर’वर आंदोलन 
एज्युकेशन जॉब्स

‘ओन्ली एमपीएससी’साठी विद्यार्थ्यांचे ‘ट्विटर’वर आंदोलन

मंगेश गोमासे - सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आरोग्य भरतीच्या तोंडावर ओळखपत्रांमुळे गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे पुन्हा एकदा खासगी कंपनी ऐवजी सर्व परीक्षा या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत(एमपीएससी)घ्याव्या अशी मागणी समोर आली आहे. त्यातूनच यावेळी रविवारी विद्यार्थ्यांनी ट्विटरवर ‘ओन्ली एमपीएससी’ ही मोहिम सुरू केली.

राज्यातील सरळसेवा भरतीसाठी सरकारने खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आले. मात्र, खासगी कंपनीच्या माध्यमातून होणाऱ्या परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर गोंधळ होत असल्याचा आरोप आहे. नुकताच झालेल्या आरोग्य परीक्षेमध्ये ओळखपत्रांवरून मोठा वादंग झाला. अनेक विद्यार्थ्यांना चुकीचे ओळखपत्र देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खासगी कंपनीला दोष दिला.

या कंपन्या आधीच काळ्या यादीत असतानाही अशा कंपन्यांकडून परीक्षा घेणे चुकीचे असल्याचा आरोप करण्यात आला. विद्यार्थ्यांचा विरोध बघता सरकारने ऐन वेळेवर परीक्षा रद्दची घोषणा केली. त्यामुळे रविवारी विद्यार्थ्यांनी ट्विटरवर ‘ओन्ली एमपीएससी’ ही मोहिम सुरू केली. यामध्ये राज्यभरतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यामध्ये नागपूरच्या विद्यार्थ्यांनीही भाग घेत सरकारच्या या धोरणाला विरोध केला. तसेच सर्व परीक्षा या यासमोर तरी एमपीएससीच्या माध्यमातूनच व्हाव्या अशी मागणी केली.

आमदारांना साकडे

पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांच्याशी स्टुडंट्स राईट्स असोसिएशन ऑफ इंडियाचे उमेश कोराम यांनी सर्व परीक्षा एसपीएससी मार्फतच घेण्यासंबंधी चर्चा करीत, तसेच राज्यातील स्पर्धा परीक्षांर्थ्यींना ‘एमपीएससी’वर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे सरकारने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता खासगी कंपनी ऐवजी सर्व परीक्षा या एमपीएससीच्या माध्यमातनू घेण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. त्यांना याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची विनंती करण्यात आली. यावेळी नागपूर समन्वयक पंकज सावरबांधे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT