Master Degree Sakal
एज्युकेशन जॉब्स

Education : विद्यार्थ्यांना आता करता येईल एका वर्षाचे मास्टर; युजीसीकडून आराखडा मंजूर

पुढील वर्षाच्या केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षेमध्ये (सीयुईटी-पीजी) विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या विषयात पात्रता मिळवून मास्टर्सचा अभ्यास करू शकतील.

सम्राट कदम

पुणे - नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना आता एक वर्षाची पदव्युत्तर पदवीही करता येणार आहे. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून पारंपारिक दोन वर्षाच्या पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच एक वर्षाचा पर्यायही उपलब्ध असणार आहे. तसेच पदवीमध्ये ज्या विषयांचा अभ्यास केला जाईल, तेच विषय निवडण्याचे निर्बंधही काढून टाकले जाणार असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष प्रा. एम. जगदीश कुमार यांनी एक्सद्वारे ही माहिती दिली आहे.

पुढील वर्षाच्या केंद्रीय विद्यापीठ प्रवेश परीक्षेमध्ये (सीयुईटी-पीजी) विद्यार्थी त्यांच्या आवडीच्या विषयात पात्रता मिळवून मास्टर्सचा अभ्यास करू शकतील. युजीसीच्या नियामक मंडळाच्या बैठकीत पदव्युत्तर कार्यक्रमासाठी नवीन अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा मंजूर करण्यात आला आहे. हा मसुदा या आठवड्यात राज्ये आणि विद्यापीठांना पाठवला जाणार असल्याचे जगदीश कुमार यांनी म्हटले आहे.

आराखड्यानुसार चार वर्षांच्या पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वर्षाच्या पदव्युत्तर पदवीचा पर्याय मिळेल. याशिवाय तीन वर्षांचा पदवी प्रोग्राम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांचा मास्टर्सचा अभ्यास करावा लागेल. याशिवाय नवीन नियमांनुसार आता विद्यार्थ्यांना अभ्यासाचे माध्यम बदलण्याचा पर्यायही मिळणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना ऑफलाइन, दूरस्थ शिक्षण, ऑनलाइन लर्निंग आणि हायब्रीडच्या माध्यमातून त्यांच्या सोयीनुसार अभ्यास करता येणार आहे.

आराखड्यातील मोठे बदल -

- नवीन अभ्यासक्रमात बहुविद्याशाखीय अभ्यासाची सुविधा

- मास्टर्ससाठी कोणताही विषय निवडण्यास सक्षम

- पदव्युत्तर शिक्षणात विद्याशाखा बदलण्याचा पर्याय

- मात्र, त्यासाठी संबंधित विषयाची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक

याकडे लक्ष द्या... -

- तीन वर्षाच्या पदवीसाठी दोन वर्षाचीच पदव्युत्तर पदवी

- नव्या धोरणातील चार वर्षाच्या पदवीसाठी एक वर्षाची पदव्युत्तर पदवी

- राज्यांनी आराखडा स्वीकारून विद्यापीठांनी अभ्यासक्रम तयार करणे गरजेचे

- विद्यापीठांनी स्वीकारल्यानंतरच राज्यात याची अंमलबजावणी होईल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहली, शुभमन गिलचे शतक, टीम इंडियाचा पहिल्या वन डेत दणदणीत विजय; मालिकेत आघाडी

Praniti Shinde: दुष्काळ जाहीर केला, पण आर्थिक मदत कुठे?’; मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Crime: साक्ष दिल्याचा बदला घेण्यासाठी पाठलाग; हद्दपार आरोपीने तेलमालिश करणाऱ्यावर चाकूने केले तीन वार

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत वाघाचे अवयव आणि २ खवले मांजर जप्त

IND vs WI 1st ODI Live: विराट कोहलीची Century! सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला; ७४ चेंडूंत इतिहास भूगोल बदलला...

SCROLL FOR NEXT