- प्रांजल गुंदेशा, संस्थापक, द इंटेलिजन्स प्लस
व्यावसायिक यशाचा आनंद घेत यश मिळवणे, गुणवत्तापूर्ण जीवन जगणे हा केवळ नशिबाने होणारा बदल नसून त्यासाठी दिनचर्येसह एकूणच जगण्यातील अनेक सवयींमध्ये बदल करून घ्यावे लागतात. यशस्वी लोकांनी हे बदल केलेले असतात. मग या यशस्वी व्यक्तींच्या अशा कोणत्या सवयी आहेत, की ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळ्या ठरतात, हे आपण जाणून घेऊया. मागील भागात आपण अशाच काही सवयींची माहिती घेतली होती. या लेखात आणखी काही सवयींबद्दल जाणून घेऊया.
सध्याच्या डिजिटल युगात वेळ मिळणं, लक्ष केंद्रित करणं आणि महत्वाच्या गोष्टींचा प्राधान्यक्रम ठरवणं हे फार अवघड जातं. यासाठी आपण डिजिटल युगात कसं वावरायचं? हे ठरवायला हवं. त्यासाठी काही महत्त्वाच्या सवयी जाणून घेऊया.
१) सर्व ‘नोटिफिकेशन्स’ बंद ठेवा. मोबाइल ‘सायलेंट मोड’मध्ये ठेवा. तुम्हाला जेव्हा वेळ असेल, तेव्हा फोन वापरा. ‘नोटिफिकेशन्स’चा आवाज आल्यावर लगेच त्या मागे जाऊ नका. कोणत्याही उपकरणाचे गुलाम होऊ नका.
याचा अर्थ कॉल किंवा मेसेज आल्यावर त्यांना उत्तर देणे आवश्यक नाही असा घेऊ नका. महत्त्वाचे फोन घ्या, मेसेज करा. मात्र, अनावश्यक फोन, मेसेज, गप्पा हे सगळं तुम्हाला मोकळा वेळ असेल, तेव्हाच करा.
यशस्वी लोक हमखास ही सवय स्वतःला लावून घेतात. काम चालू असताना सतत फोनकडे लक्ष देणे, तो चालू-बंद करणे यामुळे कार्यक्षमतेत निश्चितपणे घट होते. आपल्यापैकी बहुतेक जण असे जीवन जगतात की, जणू काही आपण खरोखरच दीर्घायुषी जगणार आहोत. मात्र, वास्तव हे आहे की, आपली हाडे कमकुवत होण्याआधी, आपण वृद्ध होण्यासाठी आपल्या हातात फार तर ३० किंवा त्यापेक्षाही कमी उन्हाळे असतात. याचाच अर्थ येणारा प्रत्येक क्षण भरभरून जगा.
२) तुमच्या उद्दिष्टाशी प्रामाणिक राहा.
यशस्वी लोक ध्येय साध्य करण्यासाठी प्रसंगी जोखीम उचलतात. स्वतःवर दबाव आला, तरी त्याला सामोरे जातात.
स्वतःच्या ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर पडतात. ते त्यांच्या यशाच्या प्राप्तीसाठी अनेक भेटीगाठी, आमंत्रणे, स्नेहमेळावे यांना नकार देतात. ते अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनांना बळी पडत नाहीत. स्टीव्ह जॉब्स, मार्क झुकेरबर्ग हे जवळजवळ नेहमीच सामान्य पोशाख केलेले दिसतात. यातूनही बरेच काही शिकण्यासारखे आहे.
३) वातावरणाला सकारात्मक ठेवून रोजच्या जगण्यातील ताण, थकवा कमी करा.
अनावश्यक गोष्टींसाठी खूप अस्वस्थ होऊ नका. त्या मानसिक ऊर्जेचा उपयोग अधिक महत्त्वाच्या गोष्टींसाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे त्यांच्यावर आपलं लक्ष केंद्रित करा. आपण कसे दिसतो याहीपेक्षा आपण किती कार्यक्षमतेने काम करतो यावर लक्ष केंद्रित करा. चुकांची पुनरावृत्ती न करता कामात सातत्य ठेवा यामुळे वैयक्तिक ब्रँड तयार होण्यास मदत होते. अशा अनेक छोट्या बदलांमुळे तुमच्या जीवनातील अतिरिक्त, नकोशा गोष्टी कमी होतात आणि तुम्हाला नवीन संधी स्वीकारण्यास मदत होते.
बऱ्याच लोकांमध्ये नैसर्गिकरीत्या आत्मविश्वास नसतो. त्यासाठी त्यांना खूप मेहनत घ्यावी लागते. कदाचित स्वतःचा पोशाख, केशरचना वगैरेवर थोडा खर्च करून स्वतःत काही बदल केले तरी अपेक्षित परिणाम दिसून येतो. त्यामुळे आत्मविश्वासही वाढतो.
४) स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करा. जेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल चांगले वाटते, तेव्हाच तुम्ही काही तरी चांगले करू शकता.
कधी कधी आपण स्वतः जसे होण्याच्या प्रयत्नात असतो, ते घडण्यासाठी, तसं चित्र निर्माण करण्यासाठी आपल्याला अधिक प्रयत्न करावे लागतात. मात्र, त्या एका गोष्टीसाठी केलेले प्रयत्न, केलेला खर्च हा १००% परतावा देणारा असतो, खरा असतो. कारण आपण स्वतःची प्रतिमा जशी निर्माण करू, तशी ती निर्माण होत असते. त्यामुळे तुम्ही स्वतः चांगले वागलात, आत्मविश्वासू राहिलात, तरच लोक तुम्हाला संधी देतील.
आपल्या जीवनाच्या कोणत्याही एका पैलूला विकसित करण्यास, प्रभुत्व मिळवण्यास वेळ लागतो. आपल्याला असं वाटतं की, काम आणि आयुष्यातील संतुलन बिघडत आहे, तेव्हा आपण त्यापासून लांब जातो किंवा सोडून देतो. मात्र, यशस्वी लोक याच्या अगदी उलट वागतात.
५) जीवनातील संतुलन साधण्याचा प्रयत्न करा.
यशस्वी लोकांना हे माहीत असतं की, एखादी मोठी गोष्टी साध्य करण्यासाठी इतर शंभर गोष्टींना नाही म्हणणे आवश्यक आहे. त्यामुळे ते त्यांच्या वेळेचा ८० टक्के भाग फक्त स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करण्यास घालवतात. उरलेला २० टक्के वेळ ते कुटुंब, आरोग्य यांसारख्या इतर गोष्टींना देतात. यासाठी ते प्राधान्यक्रमही ठरवतात.
यशस्वी व्यक्तींच्या सवयींबद्दल अधिक अभ्यासपूर्ण माहिती मिळवण्यासाठी इन्स्टाग्रामवर pranjal_gundesh या पेजला किंवा TheIntelligencePlus या यू-ट्यूब चॅनेलला भेट द्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.