

West Bengal Erupts After Poll Results: Bulldozer Hits TMC Office Amid Violent Clashes in Kolkata
esakal
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यात हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. भाजप आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात दोन्ही पक्षांच्या एक-एक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री उशिरा कोलकातातील न्यू मार्केट परिसरात तणाव निर्माण झाला. येथे टीएमसीच्या कार्यालयावर बुलडोझर कारवाई करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली.