MPSC Sakal
एज्युकेशन जॉब्स

'MPSC'च्या हजारो उमेदवारांच्या स्वप्नांचा चुराडा!

MPSC च्या हजारो उमेदवारांच्या स्वप्नांचा चुराडा! नैसर्गिक आपत्ती, सरकारच्या अनास्थेचा फटका

वैभव गाढवे

एमपीएससी करणाऱ्या अशा हजारो तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, याचे ना सरकारला देणे- घेणे आहे, ना आयोगाला.

सोलापूर : वाढत चाललेले वय, आई-वडिलांच्या अपेक्षांचे ओझे, मानसिक तणाव आणि त्यातून वाढत जाणारी चिडचिड... अशा एक ना अनेक अडचणींवर मत करत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारा तरुण वावरत आहे. त्यात अलीकडच्या काळात नैसर्गिक आपत्ती, सरकार आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (Maharashtra Public Service Commission - MPSC) अनास्था याचाही मोठा फटका तरुणांना बसत आहे. दोन वर्षे कोरोना (Covid-19) आणि लॉकडाउन (Lockdown) यामुळे कोणत्याही परीक्षा होऊ शकल्या नाहीत. आता आयोगाकडून विविध परीक्षांसाठी जाहिराती काढल्या जात आहेत. मात्र, आता वय वाढल्याने अनेक उमेदवार स्पर्धेतून बाद होत आहेत. त्यामुळे एमपीएससी करणाऱ्या अशा हजारो तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा होण्याची भीती निर्माण झाली आहे. मात्र, याचे ना सरकारला देणे- घेणे आहे, ना आयोगाला.

कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे वयोमर्यादा वाढवून देऊ, 15 हजार जागांची भरती करू, अशी आश्‍वासने मंत्री, लोकप्रतिनिधी, युवानेते यांनी दिली. मात्र, आज यातील एकही आश्‍वासन पूर्ण झाले नाही. त्यामुळे एमपीएससी करणाऱ्या हजारो तरुणांचे अधिकारी होऊन समाजाची सेवा करण्याचे स्वप्न अधुरे राहणार आहे. कोरोनामुळे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील रिक्‍त पदांमुळे पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखती होऊनही निकाल प्रलंबितच राहिला. त्यातच आरक्षणाचा पेच निर्माण झाला. यामध्ये दोन वर्षे निघून गेली. निकालाच्या प्रतीक्षेतील स्वप्नील लोणकरने कंटाळून आत्महत्या केली. त्यानंतर 'एमपीएससी'च्या सर्व जागा भरल्या जातील, आयोगामार्फत मोठी पदभरती होईल, अशा वल्गना झाल्या. मात्र, कार्यवाही शंभर टक्‍के झालीच नाही. कोरोनाच्या संकटात दोन वर्षे परीक्षा न झाल्याने वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना वाढीव संधी दिली जाईल, अशी ग्वाही सरकारमधील अनेक मंत्री, लोकप्रतिनिधींनी दिली. मात्र, त्यांच्या भरवशावर भविष्याची स्वप्ने रंगविणाऱ्या तरुणांच्या पदरी निराशाच पडली आहे. कारण, आतापर्यंत कुठेही वयोमर्यादा वाढवून मिळालेली नाही.

वयोमर्यादा संपलेल्या उमेदवारांना वाढीव संधी देऊ किंवा वयोमर्यादा वाढवून देऊ, असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सामान्य प्रशासनचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले होते. तसेच मंत्री अशोक चव्हाण यांनी ट्विट करून पुढील बैठकीत निर्णय घेऊ, असे सांगितले होते. मात्र, वाढीव वयोमर्यादेसंदर्भात अद्याप शासन निर्णय काढण्यात आला नाही. त्यामुळे एमपीएससी करणाऱ्या तरुणांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

हजारो विद्यार्थ्यांना परीक्षेला अर्जच करता येणार नाही

राज्यसेवा परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्‍टोबर आहे. म्हणजे आणखी चार दिवस. जर तोपर्यंत शासनाकडून वाढीव वयोमर्यादेबाबत निर्णय झाला नाही, तर हजारो विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्जच करता येणार नाही. शासनाने कोविडमुळे जाहिराती काढल्या नाहीत, परीक्षा झाल्या नाहीत. मात्र दुसरीकडे, विद्यार्थ्यांचे वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया सुरूच होती. यामध्ये विद्यार्थ्यांचा काय दोष, याला शासन जबाबदार नाही का? असा सवाल विद्यार्थ्यांमधून विचारला जात असून, वयोमर्यादा वाढवून मिळण्याची मागणी होत आहे.

विद्यार्थी मानसिक तणावाखाली

नैसर्गिक अपत्ती आणि शासनाच्या बेजबाबदारपणामुळे हजारो उमेदवार आज तणावाखाली वावरत आहेत. वाढते वय, घरच्यांकडून लग्नासाठी सुरू असलेला दबाव, यामुळे अनेक तरुण कात्रीत सापडले आहेत. राज्यसेवा आणि पुढच्या इतर परीक्षा आम्हाला देता येणार नसतील तर आम्ही काय करायचे, असा सवाल या तरुणांमधून विचारला जात आहे.

राज्य सरकारने शब्द पाळावा

कोविडमुळे वारंवार परीक्षा पुढे ढकलण्यात आली. यामध्ये दोन वर्षे विद्यार्थ्यांची निघून गेली. त्यामुळे वय वाढल्याने अनेकजण स्पर्धा परीक्षेतून बाद झाले आहेत. बिहारसह इतर काही राज्यांतील सरकारने वयोमर्यादेत विद्यार्थ्यांना सूट दिली आहे. वयोमर्यादा वाढविण्याचे आश्‍वासन महाराष्ट्र सरकारनेही दिले होते. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने दिलेला शब्द पाळून सरसकट किमान दोन वर्षे वयोमर्यादा वाढवावी, अशी मागणी सोलापूरसह राज्यभरातील विद्यार्थ्यांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT