Career Tips  esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : बारावीनंतर करा 'हे' बेस्ट कोर्स, नोकरीची मिळेल उत्तम संधी

करिअरची विविध क्षेत्रे खुली झाल्यामुळे विद्यार्थी देखील या नव्या वाटांना प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे, या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : सध्याच्या घडीला बदलत्या काळानुसार शिक्षणामध्ये आणि विविध क्षेत्रांमध्ये सातत्याने बदल होताना दिसत आहे. करिअरची विविध क्षेत्रे खुली झाल्यामुळे विद्यार्थी देखील नव्या करिअर वाटांना त्यांच्या आवडीनुसार प्राधान्य देताना दिसत आहेत.

विद्यार्थ्यांचा या नव्या क्षेत्रांकडे कल वाढल्यामुळे नोकरीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. परंतु, अनेकवेळा नोकरीची हमखास संधी असलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश कसा घ्यायचा? असा अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो.

मात्र, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही कोर्सेसबद्दल सांगणार आहोत. जे नोकरीसाठी बेस्ट आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या कोर्सबद्दल.

बिझनेस मॅनेजमेंट कोर्स

मागील २-३ वर्षांपासून बिझनेस मॅनेजमेंट या कोर्सला प्रचंड डिमांड आहे. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये बीबीए, एमबीए, सीए इत्यादी अनेक कोर्सेस तुम्ही करू शकता. हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला नोकरीच्या अमाप संधी निर्माण होतात. शिवाय, तुम्हाला चांगला पगार ही मिळू शकतो.

फॅशन डिझायनिंग

मागील काही वर्षांपासून फॅशन डिझायनिंग या क्षेत्राला प्रचंड मागणी वाढली आहे. सध्या हा कोर्स ट्रेंडिंगमध्ये देखील आहे. कारण, या क्षेत्रात नोकरीच्या अमाप संधी आता उपलब्ध झाल्या आहेत. शिवाय, हा कोर्स करून विद्यार्थी त्यांचे स्वत:चे बुटिक देखील सुरू करू शकतात. तरूणींसोबत आता तरूण देखील या क्षेत्राचा विचार करताना दिसत आहेत.

फॅशन डिझायनिंगमध्ये तुम्ही डिप्लोमा किंवा डिगरी देखील करू शकता. अनेक मान्यताप्राप्त संस्थांमध्ये, विद्यापीठांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये हे कोर्सेस उपलब्ध आहेत.

कम्प्युटर अ‍ॅप्लीकेशन

सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. त्यामुळे, झपाट्याने बदलणाऱ्या या युगात आता सर्व काही कामे संगणक, टॅब आणि मोबाईलच्या माध्यमातून होताना दिसत आहेत. त्यामुळे, कम्प्युटर आणि त्याच्या निगडीत कोर्सेसमध्ये नोकरीच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.  

तुम्ही पदवीनंतर, बी. टेक किंवा एनआयआयएमची परीक्षा देऊन बारावीनंतर कम्प्युटर अ‍ॅप्लीकेशन कोर्स करू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला चांगला पगार देखील मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News : रेल्वे तिकीट तपासणीला आता बॉडी कॅमेऱ्याची नजर! १५ बॉडी कॅमेरे, ३० खास जॅकेट; एसी लोकलमध्ये विशेष देखरेख

‘गौतम गंभीर चांगला माणूस आहे, पण कोच म्हणून...’; हरभजन सिंगच्या या वक्तव्याने क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण; नेमकं काय म्हणाला?

Sakal Tourism Expo 2026 : पुणेकरांना मिळणार पर्यटनाची मेजवानी! ‘सकाळ टुरिझम एक्स्पो २०२६’ २१ ते २३ ऑगस्टदरम्यान

Sakal Impact : ३ हजार ५६ विद्यार्थ्यांना दिलासा! कचरावेचकांच्या मुलांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग अखेर मोकळा; ३० सप्टेंबरपर्यंत खात्यात जमा होणार शिष्यवृत्ती

Koyana Dam Water Release : कोयना धरणातून पाणी सोडण्यात येणार; कृष्णा-कोयना नदीकाठी सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT