Career Tips esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्यूवमध्ये यश मिळवण्यासाठी ‘या’ टिप्स करा फॉलो

नोकरी मिळवण्यासाठी हे दोन्ही आव्हानात्मक राऊंड क्लिअर करणे महत्वाचे आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : करिअरचे तुम्ही कोणतेही क्षेत्र निवडा. तिथे नोकरीसाठी अप्लाय करताना तुम्हाला ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्यूवला सामोरे जावेच लागते. आजकाल सरकारी आणि खाजगी अशा कोणत्याही प्रकारातील नोकरीसाठी अप्लाय करताना ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्यूवचा राऊंड हमखास ठेवला जातो.

या दोन्ही राऊंडमध्ये क्लिअर होणे हे फार महत्वाचे असते. हे दोन्ही राऊंड तरूणांसाठी जितके आव्हानात्मक असतात तितकेच ते त्यांची मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक क्षमतांची कसोटी पाहणारे असतात. त्यामुळे, नोकरीसाठी हे दोन्ही राऊंड क्लिअर करण्यासाठी तरूणाई झटत असते.

आज आपण ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्यूवसाठी काही टीप्स सांगणार आहोत. या टीप्सच्या मदतीने तुम्ही हे राऊंड अगदी हसतखेळत क्लिअर करू शकाल आणि तुमचे करिअर यशस्वी करू शकालं.

अतिआत्मविश्वास धोक्याचा

कधीतरी असे होते की, एखाद्या विषयाची आपल्याला काहीही माहिती नसताना आपण त्या विषयावर चर्चा करतो. ही चर्चा करताना काही जण अतिआत्मविश्वास दाखवतात.

तुमची हीच चूक तुम्हाला महागात पडू शकते. कारण, अतिआत्मविश्वास दाखवून तुम्ही चर्चा सुरू केल्यामुळे, मुलाखत घेणारे किंवा पॅनेलमधील लोक तुमची परीक्षा पाहण्यासाठी त्यावर आणखी प्रश्न विचारू लागतात.

त्यामुळे, तिथे तुम्ही कमी पडता आणि तुमचे गुण कमी होतात. त्यामुळे, जर एखाद्या विषयाबद्दल तुम्हाला काहीही माहिती नसेल तर त्यावर चर्चा करणे किंवा बोलणे टाळा.

तयारी महत्वाची

मुलाखतीची किंवा ग्रुप डिस्कशनची तयारी करणे फार महत्वाचे आहे. यासाठी, तुम्ही अभ्यास करण्याची गरज आहे. पुरेशी तयारी केल्यामुळे तुम्ही मुलाखतीची तयारी चांगली करू शकाल.

ही तयारी करत असताना तुम्हाला इतर चालू-घडामोडींची माहिती घ्यावी लागेल. मुलाखतीच्या वेळी हे खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे, तुम्ही मुलाखतीमध्ये प्रश्नांची उत्तरे देण्यात कमी पडत नाही आणि चांगली तयारी केल्यामुळे, तुमचा आत्मविश्वास देखील वाढतो.

दुसऱ्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐका

जेव्हा तुम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये सहभागी होता किंवा पर्सनल इंटरव्यूवमध्ये सहभागी होता, तेव्हा त्यावेळी स्वत:च बोलत राहू नका. अशा स्थितीमध्ये दुसऱ्यांचे बोलणे देखील लक्षपूर्वक ऐकून घ्या.

दुसरा व्यक्ती बोलत असताना त्यांना मध्येच अडवू नका. त्यांचे बोलणे पूर्ण ऐकून घ्या. त्यानंतर, तुमचे म्हणणे मांडा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT