Career Tips  esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : मेकअप आर्टिस्टचे क्षेत्र निवडण्यापूर्वी ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

मेकअप हा मूळातच महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय आहे. कोणताही सण असुद्या किंवा एखादा कार्यक्रम, पार्टी, लग्न-समारंभ इत्यादी अनेक कार्यक्रमांमध्ये महिला साज-श्रृंगार करण्यासोबतच मेकअप करण्याला प्राधान्य देतात.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : मेकअप हा मूळातच महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि प्रेमाचा विषय आहे. कोणताही सण असुद्या किंवा एखादा कार्यक्रम, पार्टी, लग्न-समारंभ इत्यादी अनेक कार्यक्रमांमध्ये महिला साज-श्रृंगार करण्यासोबतच मेकअप करण्याला प्राधान्य देतात. मेकअप केल्यावर तुमचा पूर्ण लूकच सुंदर दिसतो, यात काही शंका नाही.

मागील काही वर्षांमध्ये मेकअप आर्टिस्टला प्रचंड मागणी वाढली आहे. मेकअपमध्ये आलेले नवीन प्रकार आणि महिलांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद यामुळे, या क्षेत्रामध्ये भरपूर संधी निर्माण झाल्या आहेत. अनेक तरूणींना स्वत:चा मेकअप करण्यासोबतच या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते.

अनेक महिलांना हे मेकअप आर्टिस्टचे क्षेत्र खूप सोपे वाटते. मात्र, प्रत्यक्षात तसे नाही, या क्षेत्रात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. एक चांगली मेकअप आर्टिस्ट होण्यासाठी बरीच मेहनत, संयम आणि समर्पण आवश्यक आहे.

या क्षेत्राशी निगडीत अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहित नाहीत. आज या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्हाला मेकअप आर्टिस्टचे क्षेत्र निवडण्यापूर्वी माहित असणे आवश्यक आहे.

सतत नवीन गोष्टी शिकाव्या लागतात

मेकअप आर्टिस्टचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला आता वेगळं शिकायची गरज नाही, असे अनेकांना वाटते. मात्र, प्रत्यक्षात तसे अजिबात नाही. मेकअप आर्टिस्टचा कोर्स केल्यानंतर तुम्हाला अनेकदा प्रॅक्टिस करावी लागते.

या प्रॅक्टिस दरम्यान तुम्हाला अनेक नवीन गोष्टी शिकाव्या लागतात. शिवाय, या क्षेत्रामध्ये सातत्याने नवे ट्रेंड्स आणि टेक्निक्स येत असतात. त्यामुळे, त्या तुम्हाला शिकाव्या लागतात, त्याचे अपडेट्स घ्यावे लागतात.

संवाद कौशल्य सुधारण्याची गरज

मेकअप आर्टिस्टने फक्त क्रिएटिव्ह असून चालत नाही, यासोबतच तिला तिच्या संवाद कौशल्यावर काम करावे लागते. त्यात सुधारणा कराव्या लागतात. खरे तर मेकअप आर्टिस्टला अनेक वेगवेगळ्या प्रकारचे क्लायंट्स भेटतात, त्यामुळे, मेकअप आर्टिस्टचे संवाद कौशल्य चांगले असेल, तर ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन त्याप्रमाणे काम करावे लागते. त्यामुळे, मेकअप आर्टिस्टसाठी संवाद कौशल्य हे फार महत्वाचे आहे.

ब्युटी इंडस्ट्रीबद्दल संशोधन करावे लागते

मेकअप आर्टिस्टचे काम हे फक्त मेकअप करणे नसून त्यांना ब्युटी इंडस्ट्रीमधील वेगवेगळ्या मेकअपच्या उत्पादनांवर संशोधन करावे लागते. कोणत्या कंपनीची उत्पादने चांगली आहेत? प्रॉडक्ट्स कसे आहेत? याबद्दल माहिती घ्यावी लागते.

कारण, एखाद्या कंपनीची उत्पादने खराब लागली, तर याचा परिणाम तुमच्या मेकअप आर्टिस्टच्या करिअरवर होऊ शकतो. त्यामुळे, ब्युटी इंडस्ट्रीमध्ये चांगल्या आणि ब्रॅंडेड उत्पादनांची निवड करा, जेणेकरून तुमचा मेकअप देखील चांगला होऊ शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

आठवडाभरापूर्वी मातृशोक, नितीश राणाने मैदानात उतरत आईला वाहिली अनोखी श्रद्धांजली

SCROLL FOR NEXT