Career Tips  esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : नवीन ठिकाणी जॉब करताना मनात एंग्जायटी निर्माण होते? मग, ‘या’ पद्धतीने करा हॅंडल

नवीन ठिकाणी जॉब करताना अनेकांच्या मनात चिंता आणि भिती निर्माण झालेली असते.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : करिअरमध्ये ग्रोथ करण्यासाठी आपण सर्वजण विविध प्रकारच्य आव्हानांचा सामना करतो. करिअरमध्ये एकदा स्थिर झाल्यानंतर आपण पुढे जाण्यासाठी जॉब चेंज करतो. जेव्हा नवीन नोकरी मिळते तेव्हा आपल्या मनात उत्साह आणि आनंद असतो.

मात्र, यासोबतच आपल्या मनात नव्या जॉबबद्दल चिंता आणि भीती निर्माण झालेली असते. जसे की, नवीन जॉब करताना तेथील वातावरणाशी जुळवून घ्यायला जमेल का? कामाच्या ठिकाणी तिथल्या जबाबदाऱ्या सांभाळता येतील का? असे नाना प्रश्न आपल्या मनात निर्माण झालेले असतात.

एक प्रकारची एंग्जायटी आपल्या मनात निर्माण झालेली असते. ही एंग्जायटी नेमकी कशी हॅंडल करायची? त्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत.

तयारी महत्वाची

खरं तर ही एक स्मार्ट टीप आहे. या टीपमुळे तुमचा आत्मविश्वास ही वाढेल आणि तुमचा ताण-तणाव देखील कमी होईल. जेव्हा तुम्ही नवीन ठिकाणी जॉबसाठी रूजू होता, तेव्हा त्या कंपनीबद्दल किंवा संस्थेबद्दल आधी माहिती घेतली, तर बरे होईल.

जॉबच्य पहिल्या दिवशी तुम्ही कोणत्या प्रकारची कामे करणार आहात? त्याचा विचार करण्यासाठी थोडा वेळ द्या. यासंदर्भात थोडा अभ्यास करा. यामुळे, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुमची पुरेशी तयारी देखील होईल.

जवळच्या लोकांशी संवाद साधा

नवीन ठिकाणी ऑफिसला जॉईन होण्यापूर्वी तुमच्या मनात जर भीती (एंग्जायटी) निर्माण झाली असेल तर एकदा तुमच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींशी किंवा नातेवाईकांसोबत बोला. त्यांच्याशी संवाद साधा.

त्यांच्याशी बोलल्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. शिवाय, त्यांच्याशी तुमच्या मनातील भीती शेअर केल्यामुळे ते काही गोष्टी तुम्हाला समजून सांगतील. त्यामुळे, तुम्हाला बरे वाटेल आणि मनातील भीती कमी होण्यास मदत होईल.

ताकद लक्षात ठेवा

जेव्हा नवीन नोकरी किंवा नवीन जबाबदारी आपल्याला मिळते, त्यावेळी आपल्या मनात एक प्रकारची अस्वस्थता आणि चिंता निर्माण होणे स्वभाविक आहे. त्यामुळे, अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वत:ला तुमच्या गुणांची आणि सामर्थ्याची आठवण करून देणे महत्वाचे आहे.

तुमच्यातील गुणांमुळे, तुमच्या कौशल्यामुळेच तुम्हाला हा नवीन जॉब मिळालेला आहे, हे नेहमी लक्षात ठेवा. तुमची ताकद कधीच विसरू नका. जेव्हा तुम्ही नवीन ठिकाणी नव्या जबाबदाऱ्या व्यवस्थितीपणे पार पाडाल, तेव्हा तुमच्या मनातील भीती आणि चिंता बऱ्यापैकी दूर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT