Career Tips esakal
एज्युकेशन जॉब्स

Career Tips : फ्रिलान्स प्रोजेक्ट स्विकारताना 'या' गोष्टी ठेवा लक्षात

सध्या अनेक जण फ्रिलान्सर म्हणून काम करताना दिसतात. कोरोना काळामध्ये तर या फ्रिलान्सिंगच्या कामाला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Monika Lonkar –Kumbhar

Career Tips : सध्या अनेक जण फ्रिलान्सर म्हणून काम करताना दिसतात. कोरोना काळामध्ये तर या फ्रिलान्सिंगच्या कामाला लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. खास करून महिलांचा फ्रिलान्सिंग करण्यावर अधिक भर असतो. फ्रिलान्सिंग करताना तुम्ही एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट्सवर काम करू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता.

फ्रिलान्सरला कोणताही निश्चित पगार नसतो, तो मेहनतीच्या जोरावरच कमाई करतो. हेच एक कारण आहे की, फ्रिलान्सर एकाच वेळी अनेक प्रोजेक्ट्सवर काम करण्यास तयार असतो. एवढेच नव्हे तर प्रत्येक वेळी नवीन कंपनी किंवा प्रोजेक्टवर काम करताना त्यांना धोका ही पत्करावा लागतो.

कष्ट करूनही जर पैसे नाही मिळाले तर, नंतर त्यांना खूप वाईट वाटते. तुमच्या बाबतीत असे घडू नये, असे जर वाटत असेल तर कोणताही फ्रिलान्स प्रोजेक्ट स्विकारताना काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात. कोणत्या आहेत त्या गोष्टी? चला तर मग जाणून घेऊयात.

प्रोजेक्ट वर्क पाहा

फ्रिलान्सिंगचे काम करताना तुम्हाला अनेक प्रोजक्ट्सवर काम करण्याची संधी मिळू शकते. अशा परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही एखाद्या प्रोजेक्टला हो म्हणाल, तेव्हा तो प्रोजेक्ट तुमच्या कौशल्यानुसारच आहे ना? याची एकदा खात्री करा. जर तुमच्या कौशल्यानुसारच ते काम असेल तर ते तुम्ही कोणत्याही अडचणींशिवाय ते पूर्ण करू शकता.

अनेकदा असे घडते की, जास्त पैसे कमावण्याच्या नादात तुम्ही एखादा प्रोजेक्ट स्विकारता, परंतु, त्यातल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाल माहित नसतात. मग, अशावेळी तो प्रोजेक्ट तुम्ही पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे, तुमची व्यावसायिक प्रतिमा खराब होऊ शकते. त्यामुळे, कोणतेही काम स्विकारण्यापूर्वी तो प्रोजेक्ट कसा आहे? ते अवश्य तपासून बघा.

प्रोजेक्ट वर्कची किंमत तपासा

कोणताही फ्रिलान्स प्रोजेक्ट स्विकारण्यापूर्वी तुम्ही आधी त्या प्रोजेक्टला किती पैसे आकारले जातात? ते तपासून पहायला हवे. जर एखाद्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला फारच कमी पैसे मिळणार असतील तर असा प्रोजेक्ट तुम्ही स्विकारता कामा नये.

वेळेचे भान ठेवा

जेव्हा तुम्ही एखादा फ्रिलान्स प्रोजेक्ट स्विकारता तेव्हा तुम्ही वेळेचे भान ही ठेवायला हवे. जसे की, तुम्हाला दिलेला एखादा प्रोजेक्ट हा किती दिवसांमध्ये पूर्ण करायचा आहे? त्याची डेडलाईन काय आहे? हे तपासायला हवे. जेणेकरून तुम्ही ते काम खरच त्या दिलेल्या वेळेत पूर्ण करू शकाल का? की नाही, याचा तुम्हाला अंदाज येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT