time management
time management sakal
एज्युकेशन जॉब्स

मॅनेजमेंट स्किलिंग : वेळेचे महत्त्व..!

राजेश मंडलिक rmandlik87@gmail.com

वेळेचं महत्त्व अन्य देशात वेगळं सांगावं  लागत नाही. आपल्याकडे अजूनही त्याला फारसं महत्त्व दिलं जात नाही. नाही म्हणायला, आजकाल बराच फरक जाणवतोय. ‘टाइम मॅनेजमेंट’ हे कौशल्य प्रत्येक व्यावसायिकाने अंगी बाणवणे ही गरज आहे. 

अगदी खरं सांगायचं तर वेळेला आपण काय मॅनेज करणार? त्याचे चोवीस तास हे प्रत्येकाला मिळाले आहेत. थोडक्यात सांगायचे तर वेळेला मॅनेज करण्यापेक्षा असलेल्या वेळेत स्वतःला मॅनेज करणे, आपला दिवस प्लॅन करणे हे जास्त सयुक्तिक असतं. हे करण्यासाठी आपल्या कामाचा प्राधान्यक्रम ठरवणे हे महत्त्वाचं आहे. अनेकदा असं होतं की आपल्यासमोर आलेलं काम पूर्ण करण्याच्या मागे लागतो, मग भले ते कमी महत्त्वाचं असेल. या पद्धतीत मग महत्त्वाचं काम मागे पडतं आणि ते करायची वेळ येते तेव्हा आपल्याला वेळ कमी पडतो. त्यासाठी कामाचा प्राधान्यक्रम ठरवून त्याची आखणी करणे हे खूप परिणामकारक ठरते. 

मिटिंगला वेळेवर न पोहोचणे हा आपली नेहमीची अडचण आहे. मग ती अंतर्गत मीटिंग असो वा कुणा ग्राहकाबरोबर बहिर्गत मीटिंग. वेळेवर पोहोचणे हे आपल्यासाठी नेहमीच आव्हानात्मक काम असतं. त्यासाठी मानसिक बदल घडवणं ही पहिली पायरी आहे. वेळ, मग ती कुणाचीही असो, तिला एक अमूर्त अशी किंमत असते आणि तिचा आदर करणे हे आपलं नैतिक कर्तव्य आहे ही भावना मनात रुजणे हे अत्यंत निकडीचे आहे. एकदा ती भावना मनात रुजली की आज तंत्रज्ञानामुळे असे अनेक टूल्स उपलब्ध आहेत ज्यायोगे आपण योजनाबद्ध पद्धतीने आपली कामं प्लॅन करू शकतो आणि यालाच मॅनेजमेंट भाषेत ‘टाइम मॅनेजमेंट’ म्हणत असावेत.

संगणकाशिवाय आपला दिवस सुरू होऊ शकत नाही, तिथं आपला दिवस प्लॅन करण्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध असतात. टू डू लिस्ट करता येते, कॅलेंडरमध्ये अपॉइंटमेंट टाकून ठेवता येतात, त्याचे रिमायंडर लावून ठेवता येतात. त्याच बरोबर आपल्याला काही अंतरावर प्रवास करत जायचं असेल तर गुगल मॅप या ॲपद्वारे आपल्याला प्रवासाचा वेळ बघून किती वाजता निघायचं ते ठरवू शकता. तंत्रज्ञान आपल्या दिमतीला असताना त्याचा वापर करून ‘टाइम मॅनेजमेंट’ परिणामकारकरीत्या आपण करू शकतो.

योजनाबद्ध ‘टाइम मॅनेजमेंट’ हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला तर तो फक्त मिटिंगच्या वेळा पाळणे इथपर्यंत मर्यादित राहत नाही तर व्यावसायिकतेच्या कसोटीवर जी अनेक कामं आपण ठरवतो ती वेळेत पूर्ण करणं शक्य होतं. त्यामध्ये अगदी काही प्रेझेंटेशन तयार करणे किंवा ग्राहकाला दिलेली डिलिव्हरी कमिटमेंट पूर्ण करणे यासारख्या कामांमधून तुम्ही किती योजनाबद्ध पद्धतीने दिवस आखता हे दिसून येतं. वर उल्लेखलेला कामाचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी अत्यंत काटेकोर पद्धतीने गोल सेटिंग करणे हे महत्त्वाचं आहे हे विसरून चालणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT