SBI
SBI Sakal
एज्युकेशन जॉब्स

SBI मध्ये 2056 PO पदांसाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी!

श्रीनिवास दुध्याल

एसबीआयने काढलेल्या 2056 पीओ पदांसाठी नोंदणीची विंडो आज, 25 ऑक्‍टोबर 2021 रोजी बंद होईल.

सोलापूर : स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये (State Bank of India - SBI) प्रोबेशनरी ऑफिसर पदासाठीची भरती (Recruitment) प्रक्रिया लवकरच संपणार आहे. एसबीआयने काढलेल्या 2056 पीओ पदांसाठी नोंदणीची विंडो आज, 25 ऑक्‍टोबर 2021 रोजी बंद होईल. अशा परिस्थितीत, या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार sbi.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतो.

एसबीआयने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पीओ पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावेत. यासोबतच जे त्यांच्या पदवीच्या शेवटच्या वर्षात / सेमिस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की जर त्यांना मुलाखतीसाठी बोलावले गेले तर त्यांना 31 डिसेंबर 2021 रोजी किंवा त्यापूर्वी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

वयोमर्यादा

पीओ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 1 एप्रिल 2021 रोजी 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. विविध प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

असा करा अर्ज

SBI PO च्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना प्रथम SBI च्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या 'करिअर' लिंकवर क्‍लिक करा. आता "लेटेस्ट घोषणा" विभागाखाली, 'प्रोबेशनरी ऑफिसर्स भरती' अंतर्गत ऑनलाईन अर्जाच्या लिंकवर क्‍लिक करा आणि कागदपत्रे आणि फोटो सबमिट करा. त्यानंतर फॉर्म डाउनलोड करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

अशी राहील निवड प्रक्रिया

पीओ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना तीन टप्प्यांच्या परीक्षेतून जावे लागेल. यामध्ये प्रीलिम्स, मेन आणि मुलाखतीचे टप्पे समाविष्ट आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT