College Student sakal
एज्युकेशन जॉब्स

राज्यात यंदा १,३३८ नवी महाविद्यालये

राज्यातील ११ विद्यापीठांतर्गत यंदा पदवी, पदुव्यत्तर आणि अल्पमुदतीचे अभ्यासक्रम देणाऱ्या तब्बल १ हजार ३३८ नव्या महाविद्यालयांची भर पडणार आहे.

संजीव भागवत

राज्यातील ११ विद्यापीठांतर्गत यंदा पदवी, पदुव्यत्तर आणि अल्पमुदतीचे अभ्यासक्रम देणाऱ्या तब्बल १ हजार ३३८ नव्या महाविद्यालयांची भर पडणार आहे.

मुंबई - राज्यातील (Maharashtra) ११ विद्यापीठांतर्गत यंदा पदवी, पदुव्यत्तर आणि अल्पमुदतीचे अभ्यासक्रम देणाऱ्या तब्बल १ हजार ३३८ नव्या महाविद्यालयांची (New Colleges) भर पडणार आहे. यासाठी नुकतेच महाराष्ट्र राज्य शिक्षण व विकास आयोगाने (माहेड) २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक बृहत्आराखड्याला मान्यता दिली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी नवीन महाविद्यालये सुरू करण्यासाठी आवश्यक असलेले इरादा पत्र आणि अंतिम मान्यता देण्यासाठी ३० एप्रिल ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यासाठी विद्यापीठ कायद्यात सुधारणा करणारे विधेयकही मंजूर करण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर नुकतेच नव्या महाविद्यालयांसाठी ‘माहेड’कडून बृहत्आराखड्याला मंजुरी मिळाली. त्यानंतर आता विद्यापीठांकडून त्याबाबत जाहिराती प्रसिद्ध केल्या जातील. नव्या महाविद्यालयांच्या प्रस्तावांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रमाण अधिक आहे.

नव्या महाविद्यालयांच्या प्रस्तावांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात आहे. मुंबई विद्यापीठाने २५५, त्यापाठोपाठ एसएनडीटी महाविद्यालयाने २०३, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १६५ नवी महाविद्यालये सुरू करण्यासाठीची बिंदू नामावली दिली आहे. यामध्ये विधी, फॅशन डिझाईन, फार्मसीसोबतच विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांचा समावेश आहे. दुसरीकडे शहरी भागात मराठी माध्यमांसोबत पारंपरिक कला शाखेच्या नव्या महाविद्यालयांकडे मागणी घटली असल्याचेही समोर आहे.

नव्या महाविद्यालयांच्या प्रस्तावासाठी अर्ज

मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात २५५ नवे महाविद्यालयांना मान्यता दिली जाणार आहे. त्यासाठी ३० एप्रिलपर्यंत विद्यापीठाकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी विद्यापीठाने सूचना जारी केल्या आहेत. जाहिरातीद्वारेही सदर माहिती मागवली जाणार असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. बृहत्आराखड्यात देण्यात आलेल्या स्थळबिंदूशिवाय इतर ठिकाणी सादर करण्यात येणाऱ्या कोणत्याही नव्या महाविद्यालयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली जाणार नसल्याचेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

नव्या महाविद्यालयांची प्रस्तावित संख्या

  • मुंबई विद्यापीठ - २५५

  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - १६५

  • सं. तु. म. नागपूर विद्यापीठ - १००

  • डॉ. बा. आं. म. वि. औरंगाबाद - ९२

  • पु. अ. हो. विद्यापीठ, सोलापूर - ४६

  • शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर - १०५

  • स्वा. रा. तीर्थ विद्यापीठ नांदेड - ९६

  • संत गा.बा.अमरावती विद्यापीठ - ८९

  • गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली - ७६

  • क.ब.चौ. विद्यापीठ जळगाव - १११

  • एसएनडीटी विद्यापीठ - २०३

  • एकूण - १,३३८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Passport Fees: परदेश प्रवासाचे स्वप्न महागणार! केंद्र सरकारने पासपोर्ट शुल्क वाढवले; किती आणि कधीपासून नवे दर लागू होणार?

IND vs IRE : वैभव सूर्यवंशीचे भारताच्या सीनियर खेळाडूंसोबत पहिले सराव सत्र कसे राहिले? मैदानावर जाताना नेमकं काय घडले? Video

Sanjay Patil: एकनाथ शिंदेंकडून संजय पाटलांची पाठराखण, पण फडणवीसांनी आरसा दाखवला; शिवसेना नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा पाढाच वाचला

INDW vs BAN W Live: गचाळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाची जगासमोर नाचक्की झाली; बांगलादेशने योग्य वेळी संधी साधली अन्...

Air India IndiGo Incident: अहमदाबाद विमानतळावरील अपघात टळला; दोन विमानं अचानक समोरासमोर; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT