Online Admission Sakal
एज्युकेशन जॉब्स

CDS and NDA Admission : ‘सीडीएस’, ‘एनडीए’च्या प्रवेशप्रक्रियेला सुरुवात

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) व नेव्हल ॲकॅडमी (एनए) येथे प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) वतीने संयुक्त संरक्षण सेवा (सीडीएस) आणि राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) व नेव्हल ॲकॅडमी (एनए) येथे प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ६ जून आहे.

या प्रवेशप्रक्रियेंतर्गत मुला-मुलींना अर्ज करता येणार आहे. दोन्ही प्रवेश प्रक्रियांसाठी पात्रता वेगवेगळ्या असून, सीडीएससाठी शैक्षणिक पात्रता पदवी तर एनडीए व एनएसाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रतेबरोबर वयोमर्यादादेखील ठेवण्यात आली आहे. यामध्ये लेखी परीक्षा आणि त्यानंतर सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती (एसएसबी) अशा टप्प्यांत ही प्रक्रिया पूर्ण होत उमेदवारांची निवड पुढील प्रशिक्षणासाठी केली जाईल.

सीडीएसच्‍या माध्यमातून इंडियन मिलिटरी ॲकॅडमी (आयएमए), ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (ओटीए), नेव्हल ॲकॅडमी आणि एअरफोर्स ॲकॅडमीसाठी उमेदवारांना प्रवेश दिला जाईल. यासाठी एकूण ३४९ जागा ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान एनडीए आणि नेव्हल ॲकॅडमीसाठी एकूण ३९५ जागा राखीव असून, त्यामध्ये मुलींसाठी ३५ जागा ठेवण्यात आल्या आहेत.

दोन्ही प्रवेश प्रक्रियांसाठी घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षा ३ सप्टेंबर रोजी नियोजित करण्यात आल्या आहेत. यासाठी देशातील विविध केंद्रांवर या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एसएसबीसाठी जाता येणार आहे. त्यातून निवड झालेल्या उमेदवारांना पुढे संबंधित प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : गौतम अदानी अयोध्येत दाखल

SCROLL FOR NEXT