Uday Samant Sakal
एज्युकेशन जॉब्स

ऑफलाइन परीक्षेसाठी पदवीच्या विद्यार्थ्यांना मिळणार अतिरिक्त वेळ

सकाळ डिजिटल टीम

कोरोना महामारीने सगळ्या जगाला वेठीस धरले होते. या काळात विद्यार्थ्यांचे वर्ग आणि परीक्षा या ऑनलाईन घेण्यात आल्या. दरम्यान आता कोरोना परिस्थिती आटोक्यात येत असताना विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत. या दरम्यान विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतल्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी सांगितले आहे.

कोरोना काळात विद्यार्थ्यांचा लिहीण्याचा सराव कमी झाल्याने, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती, दरम्यान कुलगुरूंच्या बैठकीत विद्यार्थ्यांना प्रति तास १५ मिनिटे वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे उच्च तंत्रज्ञज्ञान शिक्षणमंत्री उदय सामंत यानी ट्विट करत सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी होत होती, ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास १५ मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑफ लाईन परीक्षेसाठी वेळ वाढून द्यावी ही मागणी प्रामुख्याने युवा सेनेने केली होती, असेही त्यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये सांगितले आहे. ऑफलाईन परीक्षेत विद्यार्थ्यांना या वाढवून मिळालेल्या वेळेचा फायदा होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सचिन अहिर यांची बिनविरोध निवड, विरोधकांनी अर्ज का मागे घेतला? सभागृहात काय घडलं?

Mumbai Local: प्रवाशांची सुरक्षा कोणाच्या भरोशावर? मुंबई लोकलमध्ये आरपीएफ आणि जीआरपी कर्मचाऱ्यांचा तुटवडा; २,५५९ पदे रिक्त

Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Sanjay Raut Statement : संजय राऊत म्हणाले 'आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे'; मूळ शिवसैनिकांवरच पक्ष उभा राहतो

Hardik Pandya Trade: हार्दिकसाठी CSKसह एकूण ७ फ्रँचायझींमध्ये चुरस; दोनच संघ ज्यांना Mumbai Indians च्या कर्णधारामध्ये नाही रस

SCROLL FOR NEXT