UPSC Commission  sakal media
एज्युकेशन जॉब्स

UPSC करणार सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकारी पदांची भरती!

UPSC करणार सहाय्यक प्राध्यापक व वैद्यकीय अधिकारी पदांची भरती! 11 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज

श्रीनिवास दुध्याल

केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि इतर पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे.

सोलापूर : केंद्रीय लोकसेवा आयोग (Central Public Service Commission - UPSC) ने सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि इतर पदांच्या भरतीसाठी (Recruitment) अधिसूचना जारी केली आहे. या अंतर्गत एकूण 64 पदांची भरती केली जाईल. ज्या उमेदवारांना या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे, ते अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2021 आहे. अर्ज करताना उमेदवारांनी अधिसूचना फॉर्म पूर्णपणे वाचावा आणि त्यानुसार अर्ज करावा, कारण फॉर्ममध्ये काही विसंगती आढळल्यास अर्ज नाकारला जाईल.

रिक्त जागांचा तपशील

  • असिस्टेंट प्रोफेसर- 1

  • असिस्टंट डिफेंन्स Estates ऑफिसर : 6

  • सिनिअर सायंटिफिक ऑफिसर ग्रेड - II : 3

  • सिनिअर सायंटिफिक ऑफिसर केमिस्ट्री : 3

  • सिनिअर सायंटिफिक ऑफिसर II इंजिनिअरिंग : 3

  • असिस्टंट डायरेक्‍टर : 1

सहाय्यक संचालक आणि इतर पदांसाठी असा करा अर्ज

सहाय्यक संचालक व वैद्यकीय अधिकारी आणि इतर पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट upsc.gov.in ला भेट द्यावी. मेन पेजवरील रिक्रूटमेंट टॅबवर क्‍लिक करा आणि नंतर "ऑनलाइन रिक्रूटमेंट ऍप्लिकेशन' वर क्‍लिक करा. "आता अर्ज करा' यावर क्‍लिक करा आणि अर्ज भरण्यास सुरवात करा. त्यानंतर सर्व तपशील प्रविष्ट करा. कागदपत्रे अपलोड करा आणि आवश्‍यक ते शुल्क भरून सबमिटवर क्‍लिक करा. तुमचा UPSC भरती 2021 अर्ज सबमिट केला जाईल. भविष्यातील संदर्भासाठी एक प्रत डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढून घ्या.

असे असेल शुल्क

UPSC द्वारे भरण्यात येणाऱ्या विविध पदांसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य / OBC / EWS पुरुष श्रेणी अंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज फी म्हणून रु. 25 भरावे लागतील. तथापि एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ महिला उमेदवारांच्या श्रेणी अंतर्गत अर्ज करणाऱ्यांना फीमध्ये सूट दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress vs BJP Political Clash : 'मरण्यापूर्वी ज्याप्रमाणे दिवा तेजाने पेटतो, त्याप्रमाणे भाजपचा शेवट जवळ आलाय'; DK शिवकुमारांची जहरी टीका

Insurance: अपघात झाला तरी खिशाला फटका नाही! Zero Dep Insurance मुळे कसे वाचतील पैसे?

CJI SuryaKant: एनसीईआरटीचा धडा वादाच्या भोवऱ्यात! न्यायिक भ्रष्टाचार प्रकरणावर सरन्यायाधीशांचा थेट इशारा!

दहावीच्या पेपरला गेलेली विद्यार्थीनी वर्गातच कोसळली, उपचाराआधीच मृत्यू; काय घडलं?

Viral Video : भर लग्नात मर्डरचा थरार! प्रियकराने वरमालावेळी नवरीवर झाडल्या गोळ्या; नवरदेव बघतच राहिला अन्...धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT