Various opportunities in bio engineering sakal
एज्युकेशन जॉब्स

बायो-इंजिनिअरिंगमधील विविध संधी

बारावी पूर्ण करून आपल्या आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेणे हा खूप महत्त्वाचा अनुभव असतो. यावर आपले पुढचे जीवन अवलंबून असते.

सकाळ वृत्तसेवा

- डॉ. श्रद्धा कुलकर्णी, सहाय्यक प्राध्यापक

बारावी पूर्ण करून आपल्या आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेणे हा खूप महत्त्वाचा अनुभव असतो. यावर आपले पुढचे जीवन अवलंबून असते. आताचा काळ हा आंतरविद्या शाखांचा आहे. त्यामुळे कोणत्याही एका मूलभूत विषयाची पदवी घेणं पुरेसं ठरत नाही. प्रत्येक क्षेत्र विकसित होताना त्यात आंतरविद्याशाखीय संशोधन आणि तंत्रज्ञान यांचा सहभाग असतो. बायोइंजिनिअरिंग हे असेच क्षेत्र आहे, ज्यामध्ये बऱ्याच क्षेत्रांचा एकत्रित समावेश होतो. असे म्हणतात की, येणारे युग हे बीटीचे (बायोटेक्नॉलॉजी) आहे. त्या अर्थानेही या अभ्यासक्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

बायो इंजिनिअरिंगमध्ये बायोलॉजी आणि अभियांत्रिकी याचे संयोजन केले जाते. बारावीनंतर ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी करायचं आहे, पण बायोलॉजीचे क्षेत्र सोबत असावे असे वाटते, त्या सर्वांसाठी हा अभ्यासक्रम एक उत्तम पर्याय आहे. जे विद्यार्थी जेईई आणि नीट अशा दोन्ही परीक्षा देत आहेत आणि ज्यांनी गणित आणि बायोलॉजी अशा दोन्हीही विषयांचा अभ्यास बारावीमध्ये केला आहे, त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम एक उत्तम पर्याय आहे. बायोलॉजी आवडणारे विद्यार्थी किंवा मेडिकल क्षेत्राकडे आकर्षित विद्यार्थी आणि उपलब्ध जागा यांचे व्यस्त प्रमाण पाहता बायो इंजिनिअरिंग कोर्स अशा विद्यार्थ्यांसाठी उत्तम पर्याय ठरू शकतो.

वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टरांव्यतिरिक्त खूप सारे तज्ज्ञ लोक काम करत असतात. त्यांच्याशिवाय हे क्षेत्र चालू शकत नाही. उदाहरणार्थ - बायोमेडिकल इंजिनिअर, ड्रग डिस्कवरी सायंटिस्ट, बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सायंटिस्ट, बायो इन्फॉर्मेशन, जैवतंत्रज्ञ, रेग्युलेटरी अफेअर स्पेशलिस्ट या सर्व प्रकारच्या प्रोफाइलसाठी बायोइंजिनिअरिंग ही उपयुक्त पदवी आहे. नामांकित गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट जसे की, आयआयटी मद्रास, आयआयटी दिल्ली, आयआयटी मुंबई आणि प्रतिष्ठित खासगी विद्यापीठांमध्येही बी.टेक. बायो इंजीनिअरिंग हा चार वर्षांचा पदवी कोर्स उपलब्ध आहे.

पात्रता

  • विद्यार्थी विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेला असावा.

  • जे.ई.ई, नीट, सीईटी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा.

महत्त्व

भारतामध्ये बायोमेडिकल डिवाइस क्षेत्राची वाढ ही ११ अब्जवरून ५० अब्जपर्यंत जाणं २०२५ पर्यंत अपेक्षित आहे. ही वाढ गेले तीन वर्ष १५ टक्के ‘सीएजीआर’ने चालू आहे. पर्सन्लाइज मेडिसिन, प्रेसिजन मेडिसिन यांसारख्या क्षेत्रामुळे, जैवतंत्रज्ञानसारख्या क्षेत्रामुळे नवनवीन औषधांचा शोध वाढला आहे. शाश्वत विकास (सस्टेनेबल डेव्हलपमेंट) हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नवनवीन पर्यावरणपूरक उत्पादनांची निर्मिती आवश्यक ठरत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता बायो इंजिनियअरची गरज दिवसेंदिवस वाढत जाणे अपेक्षित आहे.

आवश्यक कौशल्ये

  • वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधनात्मक वृत्ती आणि चाकोरी सोडून वेगळा विचार करण्याची सवय

  • प्रयोग करण्यासाठीचे कौशल्य

  • आंतरविद्या शाखांचा अभ्यास करून त्याचा प्रत्यक्ष वापर करून घेणे

  • समस्येचे निराकरण करता येणे अपेक्षित.

  • सर्जनशीलता असावी, कारण या क्षेत्रात बरेचसे कार्य विद्यमान समस्यांचे निराकारण करण्यासाठी केले जाते. त्यासाठी नवीन मार्ग शोधले जातात.

विद्यार्थ्यांनी काळाची पाऊले ओळखून या क्षेत्राची शिक्षणाची निवड केली, तर त्यांचे भविष्य उज्ज्वल असेल यात शंका नाही.

(लेखिका एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठात कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : १२ मंत्र्यांना हटवले होते; मोदी सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ फेरबदल कधी झाला होता? आता दिग्गजांची गच्छंती?

IND vs ENG 1st T20I: वैभव सूर्यवंशीची सोशल मीडियावर हवा! श्रेयस अय्यर म्हणतो, मला ती दिसत नाही, कारण...; विधानाची जोरदार चर्चा

विहानला खेळायला जायचंय, तो येईल; बसवर झाड कोसळून मुलाचा मृत्यू, आई पाहतेय वाट, घरासमोरच घडली दुर्घटना

Petrol-Diesel Price: पेट्रोल 5 रुपये, डिझेल 3 रुपये स्वस्त! जुलैच्या पहिल्याच दिवशी मोठा दिलासा; 2 वर्षांनंतर पहिली दरकपात

MPSC Exam : ‘एमपीएससी’च्या परीक्षा आता होणार संगणकाधारित; भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निर्णय

SCROLL FOR NEXT