Education
Education Sakal
एज्युकेशन जॉब्स

भवितव्य घडविताना : मूल्य व आध्यात्मिक शिक्षण

सकाळ वृत्तसेवा

आपण आध्यात्मिक मूल्यांना शाळेतील शिक्षणाचा एक भाग होण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो.

- विद्यावाचस्पती विद्यानंद

आपण आध्यात्मिक मूल्यांना शाळेतील शिक्षणाचा एक भाग होण्यासाठी प्रोत्साहित करू शकतो. शालेय विद्यार्थ्यांना जीवनातील अध्यात्माचा उद्देश स्पष्ट केल्यास ते अधिक चांगले शिकतील. या मूल्यांचा समावेश करून, आपण विद्यार्थ्यांचे मन, शरीर आणि आत्म्याच्या सुदृढतेत, सक्षमतेत वाढ घडवून आणता येऊ शकते. त्यामुळे त्यांचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास होऊ शकेल.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२०च्या अनुषंगाने अभ्यासक्रमात नैतिक तर्क, पारंपरिक भारतीय मूल्ये आणि सर्व मूलभूत मानवी तसेच घटनात्मक मूल्ये (अहिंसा, स्वच्छता, सत्य, निष्काम कर्म, शांती, त्याग, सहिष्णुता, विविधता) समाविष्ट करण्याची तरतूद केलेली आहे. भारतीय संस्कृतीला समृद्ध आध्यात्मिक वारसा आहे. त्याची मूळ नैतिक मूल्ये धर्मात खोलवर रुजलेली आहेत. हे नीतिमत्त्व चांगल्याचे स्वरूप समजून घेण्याचा आग्रह धरतात, नैतिक आदर्शांचा प्रत्यक्ष वापर करून परिपूर्णतेचे जीवन मिळविण्याचे व्यावहारिक माध्यम मांडतात.

मूल्य व अध्यात्म शिक्षणाचे महत्त्व

आध्यात्मिक साहित्यात आध्यात्मिक व्यक्तीशी सुसंगत असलेली पाच मूल्ये प्रकट होतात. यामध्ये अर्थ शोधणे, परोपकारी प्रेम, आत्म-जागरूकता, दृष्टी आणि सत्यता यांचा समावेश होतो. काही मूल्ये विस्तृत आणि व्यापक रीतीने कार्य करतात, जे उप मूल्यांचा अभ्यास करण्यास परवानगी देतात. उदा - विश्वास, ध्यान, सकारात्मक विचार आणि नम्रता.

आध्यात्मिक शिक्षणाचा उद्देश

आध्यात्मिक शिक्षणाचा उद्देश मुलांच्या आत्मिक, आंतरिक क्षमतांची पूर्तता करणे आणि त्यांना येणाऱ्या अनेक अनुभवांमध्ये शिकत राहण्यासाठी आवश्यक असलेली साधने देऊन त्यांना जीवनासाठी तयार करणे हा आहे. आध्यात्मिक आरोग्य चांगले आहे ते सामान्यतः: आशा, सकारात्मक दृष्टिकोन, क्षमा, स्व-स्वीकृती, वचनबद्धता, अर्थ व उद्देश, आत्ममूल्याची भावना, स्पष्ट मूल्ये आणि शांतीची भावना प्रदर्शित करतात. मूलभूत आध्यात्मिक मूल्ये म्हणजे प्रामाणिकपणा, एकात्मता, विश्वासार्हता, सहकार्य, आदर, संयम, जबाबदारी, लवचिकता आणि एकता ही होय. मुलांमध्ये चांगली नैतिक मूल्ये रुजविणे, चांगले नागरिकत्व आणि राहणीमान तसेच वर्तन विकसित करणे गरजेचे असते.

आध्यात्मिक शिक्षणाचे फायदे

  • मनाची एकाग्रता, संयम, स्थैर्य, लवचिकता आणि दृढता ध्यानधारणेने कशी वाढते यासंबंधी शास्त्रोक्त.

  • यम, नियम, आसने, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या योगाच्या आठ अंगांची माहिती.

  • सार्थक, यशस्वी व उत्कृष्ट जीवनासाठी आवश्यक मूल्यांचे ज्ञान प्राप्त.

  • ताणतणाव व्यवस्थापन व क्रोधावर विजय प्राप्त करण्यासाठी आध्यात्मिक जीवनशैलीचे आकलन.

  • ध्यान अभ्यासाच्या विधी व राजयोग त्याव्दारे होणारा मानवी प्रकृतीवर परिणाम याची अनुभूती करून अनात्रिक स्तरावर मूल्यांची जोपासना करणे.

  • आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या पुरुष व महिला, तरुण मुले मुली यांच्यासाठी आध्यात्मिक शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच संवाद व अध्ययनाची कौशल्ये विकसित करण्याची संधी.

अभ्यासक्रमातील विविध पर्याय

  • डिप्लोमा इन व्हॅल्यू अँड स्पिरीच्युअल एज्युकेशन

  • डिप्लोमा इन काउन्सिलिंग अँड स्पिरीच्युअल हेल्थ

  • अॅडव्हान्स डिप्लोमा इन व्हॅल्यू अँड स्पिरीच्युअल एज्युकेशन

  • बी.ए. इन व्हॅल्यू अँड स्पिरीच्युअल एज्युकेशन

  • बी.एस्सी. इन व्हॅल्यू अँड स्पिरीच्युअलिटी

  • पीजी डिप्लोमा इन व्हॅल्यू एज्युकेशन अँड स्पिरीच्युअलिटी

  • पीजी डिप्लोमा इन व्हॅल्यू अँड हेल्थकेअर

  • पीजी डिप्लोमा इन योगा अँड व्हॅल्यू एज्युकेशन

  • पीजी डिप्लोमा इन काउन्सिलिंग अँड स्पिरीच्युअल हेल्थ

  • एम. एस. सी. इन योगा अँड व्हॅल्यू एज्युकेशन

  • एम. एस. सी. इन व्हॅल्यू एज्युकेशन अँड स्पिरीच्युअलिटी

  • एम. एस. सी. इन काउन्सिलिंग अँड स्पिरीच्युअल हेल्थ

मूल्य व आध्यात्मिक शिक्षण देणाऱ्या संस्था

  • यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक

  • अन्नामलाई विद्यापीठाच्या सहकार्याने ब्रह्माकुमारी शिक्षण शाखा, राजयोग शिक्षण आणि संशोधन प्रतिष्ठान, मदुराई

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT