एज्युकेशन जॉब्स

रि-स्किलिंग : स्वतःचा व्यावसायिक मूल्य प्रस्ताव

सगळीकडे वेगवेगळे गट आणि कळप असतात. कळपाचा भाग राहून प्रगती साध्य होत नाही, त्यापेक्षा आपण वेगळे आहोत हे सिद्ध करावे लागते.

विनोद बिडवाईक

सगळीकडे वेगवेगळे गट आणि कळप असतात. कळपाचा भाग राहून प्रगती साध्य होत नाही, त्यापेक्षा आपण वेगळे आहोत हे सिद्ध करावे लागते. हे करण्यासाठी तुम्हाला आधी स्वतःचे व्यावसायिक मूल्य नेमके काय आहे हे समजून घ्यावे लागेल. तुमचे व्यावसायिक मूल्य विधान म्हणजे, एक व्यक्ती म्हणून तुम्ही आपल्या ग्राहकांसाठी, संस्थेसाठी, सहकाऱ्यांसाठी आणि भागधारकांसाठी विशिष्ट मूल्य कसे निर्माण करता हे सांगणारे तुमचे व्यक्तिमत्वाचे वर्णन. स्वतःचे ब्रॅण्डिंग करताना, व्यावसायिक मूल्य विधान अथवा प्रस्ताव तुम्हाला प्रत्येक वेळी गरजेचे आहे. तुमच्या ‘रेसुमे’वर, मुलाखत देताना, आणि संस्थेत काम करत असताना तुमचे व्यावसायिक मूल्य सर्वाना समजायला हवे.

तुमच्यातील वेगळेपण दाखवा

संस्थेमध्ये एखादे उत्पादन विकताना, ते उत्पादन ग्राहक खरेदी का करतील, हे प्रश्न गृहीत धरून तसे ब्रॅण्डिंग केले जाते. थोडक्यात ग्राहकांना त्या उत्पादनातून, दुसरे देणार नाहीत ते काय फायदे आम्ही देणार आहेत, हे समजावून सांगावे लागते. अगदी तसेच आपल्यालाही संस्थेने नोकरी का द्यावी ह्याची माहिती तुमच्या बायोडेटामध्ये आणि मुलाखत देताना सांगता यायला हवे. तुम्ही कामावर असाल तर ते तुमच्या कामातून दिसायला हवे.

उदा. तुम्ही संस्थेच्या, ग्राहकांच्या आणि भागधारकांच्या अत्यंत क्लिष्ट समस्या सोडवता, त्यामुळे संस्थेला काही प्रमाणात उत्पादन विकायला मदत होते, हे तुमचे value proposition होऊ शकते. अर्थात, हे सर्व कसे करता हे तपशिलात सांगता यायला हवे. संस्थेत बढतीच्या वेळेस, तुमच्या वरिष्ठाना तुमचे असे गुण दिसायला हवेत. तुम्ही काय आहात, हा मुख्य संदेश सांगताना, तुम्ही असे लोक का ओळखतात, हे उदाहरण आणि दाखल्यासहीत सांगता यायला हवे. आणि ह्याची जाणीव वरिष्ठाना होणे महत्त्वाचे ठरते.

मूल्य प्रस्ताव तयार करा

तुमचे मूल्य काय आहे आणि ते तुम्ही कसे तयार करता हा एक प्रश्न नेहमी स्वतःला विचारात राहा. तुम्ही विक्री व्यवस्थापक असाल तर, ‘‘विक्री व्यवस्थापक म्हणून, मी ऑपरेशनल उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्ण विक्रीद्वारे उच्च दर्जाचा व्यवसाय विकसित करण्यासाठी अविरत काम करणारा संघ मी तयार करतो.’’ हा तुमचा मूल्य प्रस्ताव ठरू शकतो. हे तुम्ही कसे करता, ह्याआधी असे केले आहे का, हेही सांगता यायला हवे. अर्थात, हे सर्व तुमच्या अनुभवावर अवलंबून आहे. आपले भूतकाळातील अनुभव परिभाषित करताना भविष्यातील तुमचा दृष्टिकोन काय आहे, हेही समजायला हवे. भविष्यात मूल्य निर्माण करण्यासाठी तुमचा भूतकाळातील अनुभव भविष्यात कसा उपयोगी ठरू शकतो हे सांगता आले, की प्रगती होण्याच्या संधी जास्त येतात. तुम्ही इतरांपेक्षा वेगळे आणि अद्वितीय का आणि कसे आहात हे तुमची प्रतिभा, कौशल्ये, यश, ते यश कसे मिळाले ह्याचे पुरावे, तुमची पुढे जाण्याची क्षमता इत्यादी प्रकारावर अवलंबून आहे.

तुम्ही कोण आहात आणि तुम्ही एखाद्या फर्म आणि संस्थेसाठी कोणते मूल्य निर्माण करू शकता, हे वर्णन करणे तुमच्या यशासाठी लक्षणीय महत्त्वाचे आहे. तुम्हाला अर्थपूर्ण आणि संस्मरणीय छाप निर्माण करण्यात स्वारस्य असल्यास, तुम्ही संभाषणात, लिखित स्वरूपात आणि तुमच्या सार्वजनिक प्रोफाइलवर तुमचा व्यावसायिक मूल्य प्रस्ताव स्पष्टपणे सांगता यायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलांनी अभ्यास करावा, आंदोलनाच्या भानगडीत पडू नये! मोदींना अपशब्द बोलणाऱ्या तरुणीची आई काय म्हणाली? पाहा Video

Indonesia Ferry Fire: इंडोनेशियात प्रवासी जहाजाला भीषण आग! ५ जणांचा मृत्यू, ४१ बेपत्ता, शोध सुरू, कशी घडली घटना?

Latest Marathi News Live Update : 'मुंबई कोस्टल रोड नॉर्थ' प्रकल्पाची पाहणी केली

Police Station Chaos: मित्राला सोडवण्यासाठी सहकारनगर पोलिस ठाण्यात गोंधळ, तोडफोड व पोलिसांना गोळ्या घालण्याची धमकी; तरुण अटकेत

Youth Empowerment: युवकांनी स्वावलंबी होऊन शेतीपूरक व्यवसायाकडे वळा : महादेव जानकरांचा संदेश

SCROLL FOR NEXT