hotel management
hotel management google
एज्युकेशन जॉब्स

बारावीनंतर काय ? हॉटेल मॅनेजमेंटमध्ये करा करिअर

नमिता धुरी

मुंबई : पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राची दरवर्षी वाढ होत आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायालाही उभारी आली आहे. बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना भविष्यात चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

हॉटेल मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात तुम्हाला हॉटेल किंवा हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसच्या विविध भागांचे शिक्षण घेता येईल. यात मार्केटिंग, फूड एंड बेवरेज, फ्रंट ऑफिस, अकाऊंटींग, फूड प्रोडक्शन, हाऊसकीपिंग यांचा समावेश होतो. भारतातील अनेक सरकारी कॉलेज आणि खासगी कॉलेजमध्ये हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिग्री आणि डिप्लोमा कोर्स आहे.

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification For Hotel Management)


हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स निवडण्यासाठी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून १० + २ उतीर्ण असणे आवश्यक आहे. हॉटेल मॅनजमेंटच्या कोणत्याही कोर्ससाठी तुम्ही बारावीनंतर प्रवेश घेऊ शकता. मान्यताप्राप्त कॉलेजमधून पदवी मिळणं गरजेचं आहे.

असा करा अर्ज (How To Apply In HM Colleges)


हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजचा फॉर्म भरुन किंवा राज्य, राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षा देऊन अर्ज करु शकता.

प्रवेश परीक्षा


नॅशनल लेवल एंट्रन्स


एनसीएचएम जेई
एआयएमए यूजीएटी AIMA UGAT
स्टेट लेवल एंट्रन्स
युपीएसई बीएचएमसीटी (उत्तर प्रदेश)
एमएएच सीटी एचएम (महाराष्ट्र)
डब्ल्यूबीजेई एचएम (पश्चिम बंगाल)

युनिवर्सिटी लेवल एंट्रन्स


पीयूटी (पंजाब विद्यापीठ)
सीयूटी (क्रेइस्ट युनिवर्सिटी)
आयपीयू सीटी (गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठ)

कॉलेज आणि विद्यापीठ (Top Universities Of Hotel Management)


इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, कॅटरिंग अँड न्यूट्रिशन्स, पूसा
आयएचएम मुंबई
वेलकमग्रुप ग्रेज्यूएट स्कूल ऑफ हॉटेल अ‍ॅडमिनिस्ट्रेशन, मणिपाल
आयएचएम हैदराबाद
एआयएचएमसीटी, बंगळुरु
बनारसदास चांदीवाला इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नोलॉजी, दिल्ली
दिल्ली इंस्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली

एकदा तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पदवी मिळवली तर तुम्हाला नोकरीसाठी अनेक पर्याय आहेत. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री, फूड एंड बेवरेज, फ्रंट ऑफिस, अकाऊंटींग, सिक्युरिटी सारखे अनेक विभाग आहेत. यासाठी तुमच्या आवडीचा विभाग निवडा आणि यामध्ये वेगवेगळ्या नोकऱ्यांसाठी अर्ज करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT