which points should you look while choosing school for your child bright future
which points should you look while choosing school for your child bright future  sakal
एज्युकेशन जॉब्स

शाळा निवडताना...

सकाळ वृत्तसेवा

पा लक म्हणून जे काही महत्त्वाचे प्रश्न आपल्यासमोर असतात त्यातला एक मोठा प्रश्न म्हणजे ‘कोणती शाळा निवडायची?

- फारूक काझी

पा लक म्हणून जे काही महत्त्वाचे प्रश्न आपल्यासमोर असतात त्यातला एक मोठा प्रश्न म्हणजे ‘कोणती शाळा निवडायची?’ आपल्यापैकी अनेक पालकांना हा प्रश्न भेडसावला असेल. भेडसावत असेल.

चंगली शाळा याची प्रत्येक पालकाची स्वतंत्र व्याख्या असते. तेव्हा प्रत्येक पालक आपल्या व्याख्येत बसणारी शाळा शोधत असतात. चांगली शाळा याबाबत एकमत होणं तसंही प्रचंड अवघडच. शिक्षणाचं मुख्य उद्दिष्टच आहे मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि एक चांगला माणूस म्हणून त्यांची जडणघडण होणे.

शाळा निवडताना आपण कोणत्या गोष्टी विचारात घेतो? आपल्या अपेक्षा आणि वस्तुस्थिती यांची सांगड कशी घालू शकतो यावर आपण विचार केला पाहिजे. खालील काही मुद्दे आपणाला चर्चेला घेता येतील.

घरापासूनचे अंतर : शाळा निवडताना हा महत्त्वाचा मुद्दा ठरू शकतो. काही पालकांना शाळा घराजवळ हवी असते. तर काही पालक चांगली शाळा असेल तर अंतराचा फारसा विचार करत नाहीत. जास्त अंतर पार करताना मुलं थकून जात नाहीत ना?

त्यांचा उत्साह कमी होत नाही ना? याचा विचार जरूर करायला हवा. घरापासून फार दूरची शाळा निवडताना याचा जरूर विचार करा. तसेच आपण तिथं कमी अवधीत पोचायला हवं अशा अंतरावरची शाळा निवडणं कधीही योग्यच.

आपल्या मुलांची गरज आणि आवड : आपल्या मुलांना नेमक्या कोणत्या स्वरूपाचं शिक्षण हवं? त्यांची गरज, आवड आणि त्यांचा कल विचारात घेतला गेला पाहिजे. आपल्या मुलाला सुरक्षित आणि आपलं वाटेल असं शाळेचं वातावरण आहे का?

की मूल तिथं रमत नाहीये, सतत चिडचिड करतंय, रडतंय... यांचा विचार जरूर करावा. कारण तिथं मुलाला शिकायचं असतं, आपणाला नव्हे. तेव्हा आपल्या अपेक्षा लादण्यापेक्षा मुलांना आवडेल आणि मूल जिथं आनंदाने रमेल ती शाळा निवडण्याकडे आपला कल असला पाहिजे.

शिक्षक-विद्यार्थी प्रमाण : एखाद्या शाळेत एकाच वर्गात खूप सारी मुलं असतात. तर काही शाळांत मोजक्या मुलांचाच वर्ग असतो. अशावेळी मुलांकडे वैयक्तिक लक्ष देता येईल, वेगवेगळ्या कृतींमध्ये सहभागी होता येईल इतपत वर्गातील मुलांची संख्या असली पाहिजे. मुलांच्या व्यक्तिमत्व विकासात असा सहभाग मोठी भूमिका बजावत असतो.

अभ्यासक्रम आणि पूरक उपक्रम : हल्ली अनेक माध्यमांच्या आणि विविध अभ्यासक्रम राबवणाऱ्या शाळा आपणाला पाहायला मिळतात. आपल्या मुलांची गरज आणि त्याची क्षमता यांचा विचार करूनच आपण माध्यम, अभ्यासक्रम निवडला पाहिजे.

जेणेकरून मुलांवर अतिरिक्त ताण येणार नाही आणि मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होत राहिला पाहिजे. इतरांनी निवडलं म्हणून, प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून माध्यम किंवा अभ्यासक्रम निवडू नका.

जी शाळा पूरक उपक्रमांचे आयोजन करते, त्यातून आपल्या मुलांचा विकास होतो आहे ना याकडे जरूर लक्ष असू द्या. काही पालक पूरक उपक्रम नको. फक्त शिकवा. मार्क्स मिळाले पाहिजेत असं सांगत असतात. तेव्हा अशा पालकांनी पूरक उपक्रमांची उद्दिष्टे आणि महत्त्व समजून घेतलं पाहिजे.

अध्यापन पद्धती : शाळा मुलांना कसं शिकवते? हा एक कळीचा मुद्दा आहे. कारण मुलांचं शिकणं आपल्या दृष्टीने महत्त्वाचं असेल तर शिकवली जाणारी पद्धती ही तितकीच महत्त्वाची असते.

तेव्हा मुलांना शिकताना आनंद मिळतोय, मुलांना शिकण्यास प्रेरित करत असेल, त्यांच्या अंगच्या गुणांना संधी मिळत असेल आणि त्यांची एक चांगला माणूस म्हणून जडणघडण होत असेल अशी शाळा आपण निवडली पाहिजे. मूलकेंद्री शिक्षण देणारी शाळा हवी.

हे परिपूर्ण मुद्दे नाहीत. यात आणखी मुद्दे जोडता येतील आणि आपण ते जोडून पाहायला हवेत. आपल्या मुलांची शाळा निवडताना आपण कशाचा विचार करायचा याचं एक स्पष्ट चित्र आपल्यासमोर तयार होईल. आणि मुलंही आनंदाने शिकू शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi in Dharashiv: अमेरिकेत व्हाईट हाऊसमध्ये जेवणाच्या टेबलवर होतं 'सूपरफूड'; मोदींनी सांगितला किस्सा

T20 WC 24 South Africa Squad : दक्षिण आफ्रिकेने टी-20 वर्ल्ड कपसाठी संघाची केली घोषणा! 2 अनकॅप्ड खेळाडूंची ताफ्यात एन्ट्री

Indian Navy: "कोणत्याही आव्हानासाठी नौदल कायम सज्ज," पदभार स्वीकारताच नवे नौदल प्रमुख गरजले

Latest Marathi News Live Update : काँग्रेस जनतेची संपत्ती, त्यांच्या व्होटबँकेला वाटणार, मोदींचा आरोप

Swapnil Joshi: स्वप्नील जोशीच्या मुलांचा 'नाच गं घुमावर' भन्नाट डान्स; पहा व्हिडीओ

SCROLL FOR NEXT